Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकळकराई मधील नागरिकांसोबत आमदार सुनील शेळके यांनी केली दिवाळी साजरी....

कळकराई मधील नागरिकांसोबत आमदार सुनील शेळके यांनी केली दिवाळी साजरी….

मावळ (प्रतिनिधी) : मावळ मतदारसंघातील अत्यंत दुर्गम भागातील शेवटचे टोक असणाऱ्या कळकराई गावामध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेले असता ग्रामस्थांकडून आमदार सुनील शेळके यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी घरावर गुढी उभारुन व मिरवणूक काढून आमदार शेळके यांचे स्वागत केले.ग्रामस्थांनी केलेल्या या आपुलकीच्या आदरातिथ्याने भारावून गेलो असल्याचे आमदार शेळके यांनी व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांबरोबर मनमोकळेपणाने चर्चा करून गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते,पाणी, वीज अशा मुलभुत सुविधांपासून या गावातील नागरिक वंचित राहिले आहेत. हे त्यांच्यासोबत संवाद साधत असताना प्रकर्षाने जाणवले.
येथील नागरिक लोकप्रतिनिधींकडे नेहमीच समस्या मांडण्याचा प्रयत्न करीत आले आहेत.यापुढील काळात मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न,भविष्याचा प्रश्न आणि आरोग्य सेवासुविधांचा प्रश्न सोडविण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील व विकासकामांना देखील प्राधान्य देऊन सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,असे यावेळी आमदार सुनील शेळके यांनी आश्वासित केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page