if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ : प्रतिनिधी (श्रावणी कामत ) – उपविभागीय सहायक पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कारवाईची मालिका सुरू ठेवत कान्हे फाट्यावर चालवण्यात येत असलेल्या मटका अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. आज दिनांक 07/06/2024 रोजी कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ आबा सातकर यांच्या चाळीतील खोलीसमोरील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकून सात आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत काळूराम पांडुरंग लालगुडे (31 वर्षे, कुसगाव), कृष्णा धारोबा जाधव (24 वर्षे, कान्हे फाटा), किसन जवेरी कोळी (65 वर्षे, कान्हे फाटा), विलास सोपान बोरडे (58 वर्षे, कान्हे फाटा), किरण विजय यादव (32 वर्षे, कामशेत), राकेश जेकुप्रसाद यादव (58 वर्षे, कान्हे फाटा) या आरोपींना मटका खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत सदर मटका अड्डा मदन वाजे (तळेगाव दाभाडे) नावाच्या इसमाने चालविल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण 92,890 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक . पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक . रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तिक, यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोसई शुभम चव्हाण, पो. हवा अंकुश नायकुडे, पो. हवा नितेश (बंटी) कवडे, पो. कॉ गणेश येळवंडे ,वडगाव मावळ पोलीस पथकाने केली आहे.
यापुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार पोलीस दलाने व्यक्त केला आहे.