Thursday, September 19, 2024
Homeपुणेमावळकान्हे साईसेवाधाम समोर अज्ञात वाहनाने एका 40 ते 45 वर्षीय अनोळखी इसमास...

कान्हे साईसेवाधाम समोर अज्ञात वाहनाने एका 40 ते 45 वर्षीय अनोळखी इसमास चिरडले…

मावळ (प्रतिनिधी): मुंबई पुणे महामार्गा वर कान्हे फाटा साई सेवाधाम समोर अज्ञात वाहनाने चिरडल्याने एका 40 ते 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे.ही घटना आज पहाटे 4:43 वा च्या सुमारास मुंबई पुणे लेनवर घडली.
याबाबत श्रीकांत घोडमोरे यांनी वडगांव मावळ पोलीस स्टेशनला फोनद्वारे खबर दिली की,दिनांक-06/07/2023 रोजी पहाटे 04:43 वा.चे. पुर्वी मौजे कान्हे ता. मावळ जि.पुणे गावचे हद्दीत जुना मुंबई पुणे हायवे रोडवर साईसेवाधाम समोरील मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर पश्चिमेस 07 कि.मी. जवळ अज्ञात वाहनाने एका अनोळखी पुरूष वय अंदाजे 40 ते 45 वर्ष याला धडक देऊन मयत झाला आहे. सदर खबरीवरून फेटल मोटार अपघात रजि.18/2023 दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page