Thursday, August 7, 2025
Homeपुणेकामशेतकामशेतकर नागरिकांची सतर्कता; चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं..

कामशेतकर नागरिकांची सतर्कता; चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं..

प्रतिनिधी : श्रावणी कामत.

कामशेत : शहरातील एका कापड दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट २०२५) रोजी रात्री कामशेत येथे घडली.

याप्रकरणी कामशेत पोलिसांनी संतोष विनायक गायकवाड (वय २५, रा. अंबरनाथ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याच्यासोबत आलेल्या चार महिला साथीदार चकमकीनंतर घटनास्थळावरून पसार झाल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कामशेत येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या ‘रॉयल कलेक्शन’ या कापड दुकानात आरोपी महिलांसह खरेदीच्या बहाण्याने प्रवेश केला होता. दुकानातील कपडे चोरून पळण्याचा प्रयत्न सुरू असताना दुकानदार धीरज परमार यांना संशय आला. त्यांनी तत्काळ आरडाओरड केल्यावर ग्रामस्थ रोहिदास वाळुंज आणि अन्य नागरिकांनी तत्परतेने धाव घेत आरोपीला पकडले.

नागरिकांच्या या तत्पर आणि धाडसी कृतीमुळे चोरीचा प्रयत्न हाणून पाडला गेला असून, सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांकडून फरार महिलांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page