१९ वर्षीय तरुणी बेपत्ता; नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन..
कामशेत : मावळ तालुक्यातील बुधवडी येथील १९ वर्षीय तरुणी सोनाली मनोहर टाकळकर ही १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. ती नायगाव गावच्या हद्दीत टोनी ढाब्यासमोरून जुना मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकीकडे हात करत वडगाव मावळ रोडच्या दिशेने गेली. मात्र, त्यानंतर ती परतली नाही.
तिच्या शोधासाठी कामशेत पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास कामशेत पोलीस स्टेशन (०२११४-२६२४४०), पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील (९९२३४०७३११) किंवा पोलीस हवालदार एन. आर. कळसाईत (९८५०२५९९११) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सोनाली हिची उंची ५ फूट ३ इंच असून ती सावळ्या रंगाची आणि सडपातळ शरीरयष्टीची आहे. ती बेपत्ता होताना मेहंदी रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली होती. तिच्या गळ्यात सोन्याची चैन असून पायात गुलाबी रंगाची चप्पल आहे. तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते.