कामशेत : आज पहाटे 3 वा च्या सुमारास कामशेत खिंडीमध्ये कंटेनर दरीत कोसळल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर वरती पोकलेन ठेवून कंटेनर मुंबईच्या दिशेने जात असताना कामशेत खिंडीमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस त्याचे स्टेरिंग ब्लॉक झाल्याचे कळून येत आहे व चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी सरळ रस्त्याचे सुरक्षा बॅरिकेड्स तोडून खाली दरी मध्ये गेल्याचे दिसून येत आहे त्यातच गाडीतील चालकाने बाहेर उडी घेतल्याने त्याचा जीव वाचल्याचे स्थानिकांकडून कळून येत आहे.
कामशेत खिंडीमध्ये अपघाताचे सत्र सुरूच असून अनेक वाहने याठिकाणी बंद पडत असतात तसेच अनेक अपघातांचे कारण वाहनांची ना दुरुस्ती असल्याने अनेक कंपनीवाले नादुरुस्त वाहने महामार्गावर चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आज झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशाच प्रकारे नादुरुस्त व दुरुस्तीस आलेले वाहन अजून देखील कंपन्यांनी चालवले तर हे अपघातांचे सत्र कायम सुरु राहणार अशी शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक प्रवासी आशा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आपला जीव मुठीत घेऊन खिंडीमधून प्रवास करत असल्याचे स्थानिक प्रवाश्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.तरी प्रशासनाने नादुरुस्त व ओव्हरलोड व दुरुस्तीस आलेले वाहन हे खाजगी कंपन्या वाले व ट्रान्सपोर्ट कंपन्या वापरत असल्यास यांच्यावर वाहतुकीस बंदी घालावी असे यावेळी प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.