Tuesday, September 17, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत पोलीसांची मोठी कारवाई, ५६ लाख रुपयांचा गांजा जप्त..

कामशेत पोलीसांची मोठी कारवाई, ५६ लाख रुपयांचा गांजा जप्त..

प्रतिनिधी श्रावणी कामत
कामशेत : दि २२ पोलीसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५६ लाख ९२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ताजे (ता. मावळ) गावाजवळील हायवे रोडमार्गे गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून सापळा रचण्यात आला.
त्यानंतर, एका सिल्व्हर रंगाच्या वेरना कार (नंबर एम.एच/१४/जी.वाय/०५५०) चा तपास घेण्यात आला. कारची पाहणी करताना डिकीत ९८ किलो वजनाचा गांजा मिळून आला. या कारवाईत अभिषेक अनिल नागवडे (वय २४), प्रदिप नारायण नामदास (वय २५), योगेश रमेश लगड (वय ३२) आणि वैभव संजीवण्न चेडे (वय २३) या चौघांना अटक करण्यात आली. आरोपी सर्व कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी आहेत.
पोलीसांनी जप्त केलेला मुद्देमालामध्ये ४८ लाख ५० हजार रुपये किमतीचा गांजा, ८ लाख रुपये किमतीची वेरना कार आणि ४२ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल हँडसेट असा एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीसांकडून सुरू असून या तपासामध्ये आणखी काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे आणि सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदार रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे आणि रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page