Thursday, July 3, 2025
Homeपुणेकामशेतकामशेत येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद...

कामशेत येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद…

कामशेत (प्रतिनिधी) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडगांव मावळ तहसील कार्यालयाच्या वतीने कामशेत येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे त्यानुषंगाने आज कामशेत येथील श्री गणेश मंगल कार्यालयात तहसील कार्यालयाच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत तात्काळ सोडविण्यात आल्या.

या उपक्रमामध्ये कामशेत शहर,नाणे मावळ,पवन मावळ येथील नागरिकांनी उत्स्पूर्तपणे सहभागी होत आपल्या अडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवून घेतल्या तसेच यावेळी उत्पन्न प्रमाणपत्र व जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे ,किरण भाऊ राक्षे,कामशेत शहर मच्छिद्र केदारी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे,अभिमन्यू शिंदे,शंकर पिंगळे,विठ्ठल तुर्डे,सारिकाताई शिंदे,समिर भोसले,अजय फावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page