कामशेत (प्रतिनिधी): डेक्कन क्वीन रेल्वे एक्सप्रेसच्या धडकेने एका अज्ञात 40 ते 45 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.12 रोजी रात्री 9:30 वा. च्या सुमारास कामशेत येथे घडली.
सदर घटना कामशेत रेल्वे कि.मी.143/28 हद्दीत गुरुवार दि.12 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास घडली.डाऊन डेक्कन क्वीन रेल्वे एक्सप्रेसच्या धडकेने डोक्याला गंभीर मार लागून मेंदू बाहेर आला असल्याने मृत्यू झाला आहे.
सदर मयत हे निर्वस्त्र असून वय अंदाजे 40 ते 45 वर्ष, अंगाने मध्यम बांधा, रंग गहूवर्णीय, डोक्याचे केस काळे वाढलेले, दाढी मिशी काळी बारीक असे असून नाव व पत्ता माहिती नसून सदर मयताबाबत काही माहिती असल्यास रेल्वे पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अंमलदार ए. डी. जाधव यांनी केले आहे.