Wednesday, December 4, 2024
Homeपुणेमावळकामशेत येथे हवेत फायरिंग करणाऱ्यांना जामिन मंजूर ,न्यायदंडाधिकारी मे. जी. एस. पाटील...

कामशेत येथे हवेत फायरिंग करणाऱ्यांना जामिन मंजूर ,न्यायदंडाधिकारी मे. जी. एस. पाटील कोर्टाचा निर्णय !

कामशेत : कामशेत येथील रुचिरा हॉटेल मध्ये आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा करत असताना जोश मध्ये येवुन पिस्टल मधुन हवेत फायरिंग करण्याची घटणा दि . 22/06/2022 रोजी घडली होती.

त्याचा सखोल तपास करुन कामशेत पोलिसांनी रुपेश ज्ञानेश्वर वाघोले , लहु अर्जुन काळे , अमोल ज्ञानेश्वर भेगडे व हॉटेल मालक गोपाळ धोंडीबा गायखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . त्या गुन्ह्यतील आरोपींना वडगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मे . जी . एस . पाटील साहेब न्यायालयाने चार दिवासांच्या पोलिस कोठडी नंतर आज दि . 28/06/2022 रोजी पंधरा हजार रुपांच्या जामीनावर व इतर अटींवर मुक्त केले आहे.

अरोपींच्या वतीने न्यायालयात ॲड . महेंद्र खांदवे व ॲड. घनशाम दाभाडे यांनी बाजु मांडुन अरोपींना जामिन मिळवून दिला.

- Advertisment -

You cannot copy content of this page