Sunday, August 3, 2025
Homeपुणेकामशेतकामशेत रेल्वे स्टेशन हद्दीत आढळला बेवारस तरुणाचा मृतदेह...

कामशेत रेल्वे स्टेशन हद्दीत आढळला बेवारस तरुणाचा मृतदेह…

लोणावळा (प्रतिनिधी): कामशेत रेल्वे स्टेशन हद्दीत कि. मी.143/26 दरम्यान एका 30 ते 35 वयोगटातील बेवारस मृत देह आढळला आहे.
मृत देह हा अंदाजे वय 30 ते 35 वयोगटातील पुरुषाचा असून याच्या जवळ अंगावरील शर्ट शिवाय ओळखीचा कोणताच पुरावा मिळाला नसल्याने रेल्वे पोलिसांना त्याच्या नातेवाईकांचा शोध लावण्याचे आवाहन निर्माण झाले असून, त्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट त्यावर अनिल फायर वर्क्स खोपोली असे लिहिले आहे. सदर मयताची ओळख पटल्यास रेल्वे पोलीस हवालदार जाधव मो. क्र.9823439995 वर संपर्क करावा.
- Advertisment -

You cannot copy content of this page