![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )भिसेगाव ते चारफाटा रस्त्याचा वनवास गेली अनेक वर्षे संपत नसताना दिड वर्षांपूर्वी सुरू झालेले काम रखडत – रखडत एक बाजू पूर्ण होऊन दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर झाडी उगवली तरी बेजबाबदार पालिका प्रशासन लक्ष देत नव्हती , की ठेकेदारावर देखील कुणाचे अंकुश नव्हते . याविरोधात वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी सोमनाथ ठोंबरे , उमेश गायकवाड , पुष्पा दगडे व भिसेगाव ग्रामस्थ त्याचप्रमाणे माहिती अधिकार संघटनेचे शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी यांनी तक्रार निवेदन देऊनही व दोन वेळा उपोषण करूनही अर्धवट असलेल्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने अखेर याविरोधात कर्जत – खालापूर मतदार संघाचे माजी आमदार लोकनेते सुरेशभाऊ लाड यांनी जनआक्रोशाला साथ देत आज कर्जत नगर परिषदेला या वनवास प्राप्त रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारण्यासाठी क्रोध भेट दिली व संताप व्यक्त केला.
मात्र पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे अनुपस्थित होते ,त्यामुळे माजी आमदार सुरेशभाऊ लाड मुख्याधिकारी गारवे यांच्या गलथान कारभारावर नाराज झाले व बेजबाबदार प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले , यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व भिसेगाव – गुंडगे ग्रामस्थ उपस्थित होते.भिसेगाव ( श्रध्दा हॉटेल ) ते चारफाटा हा सिमेंट काँक्रीट चा रस्ता मे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन , प्रो प्रा नरेश आधसानी या ठेकेदाराने काम घेतले आहे . मात्र स्थानिक ठेकेदार यांत काम पहात असल्याने पालिका प्रशासन मूळमुळीच्या भूमिकेत दिसत आहेत.
एक वर्षांची मुदत संपून गेलेली आहे , तर तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे – शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांना दुर्लक्षित केले मात्र भिसेगाव – गुंडगे व पंचक्रोशीतील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळत थोडी थोडकी नाही तर या रस्त्याच्या कामाला ९ महिन्यांची मुदत वाढ दिली आहे .येथील नागरिकांना आता या रस्त्याचा त्रास सहन करण्या पलीकडे गेला आहे . येथील बस थांबा बंद आहे , एकेरी रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू आहे , वाहतूक कोंडी होत आहे , काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे , साईट पट्टीचे पेव्हर ब्लॉकचे काम खराब आहे , नागरिकांना काळोखातून प्रवास करावा लागत आहे , प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीर दुकान बांधकाम अर्धवट अवस्थेत राहिल्याने बकालपणा दिसत आहे , एक नाही तर अनेक समस्याच उद्भवल्याचे चित्र येथे दिसत असताना एमएमआरडीए चे अधिकारी मौन बाळगून आहेत.
या सर्व समस्यांना तोंड देताना जनआक्रोश होत असताना या आक्रोशाला साथ देत माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी पालिका प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली असून आठ दिवसांत प्रत्येक्षात सिमेंट – काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास आमरण उपोषणाचा क्रोध ईशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.सदर जनआक्रोश क्रोध भेटीच्या वेळी माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तानाजी चव्हाण , विरोधीपक्ष नेते शरदभाऊ लाड , माजी नगराध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष राजेश दादा लाड ,माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड , भिसेगाव नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , नगरसेविका पुष्पा दगडे , नगरसेवक उमेश गायकवाड , माहिती अधिकार संघटनेचे शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी , प्रकाश हजारे , युवक अध्यक्ष सोमनाथ पालकर , चंद्रकांत राऊत , संजय हजारे , युवा नेते कृष्णा जाधव , अतुल कडू , अक्षय लाड , अमीर भाई मनियार , नितीन दगडे , कैलास पोटे , अनिकेत लाड , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच भिसेगाव – गुंडगे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .