भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यासहित खालापूर मतदार संघात देखील कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विकास कामाच्या ” झंझावाताने ” शिवसेना अधिक भक्कम झाली असून विरोधक उठवत असलेल्या ” वावड्या फेल ” ठरवत त्यांच्या करिष्म्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ” जोर का झटका , धीरे से ” लगावून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले खालापूर तालुक्यातील दिग्गज नेतृत्व , कट्टर शिवसैनिक असलेले वालचंद शेठ ओसवाल यांनी पुन्हा घर वापसी करत कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा ” शिवसेनेत ” पक्ष प्रवेश केला . त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने खालापूर तालुक्यात शिवसेना अधिक भक्कम झाली असून विरोधकांनी ” ठोकलेली आरोळी ” हि फुसकी ठरली आहे.
खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे दिग्गज नेते वालचंद शेठ ओसवाल यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता , पण पुन्हा कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशाच्या वेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत रायगड जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , शिवसेना नेते उल्हासजी भुरके , तालुकाप्रमुख संदेश पाटील , कर्जत पंचायत समितीचे मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे, त्याचप्रमाणे खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.