if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे कर्तृत्व दिवसेंदिवस ” उजळत ” चालले असून त्यांनी धरलेली ” विकासाची धार ” आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जाऊन पोहचली आहे . त्यामुळे गौरकामत ग्रामपंचायतीमधील माजी उपसरपंच व राष्ट्रवादीचे त्या भागातील भारदस्त नेते राहुल पिंगळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दुभंगलेल्या राष्ट्रवादीच्या मनमानी व हुकुमशाहीला कंटाळून अखेर कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ऐन गौरकामत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ” हादरा ” बसला असून आत्ताच्या निवडणुकीत व पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना या परिसरात मजबूत झाल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.
यावेळी माजी उपसरपंच राहुल पिंगळे यांच्यासह श्रीकांत पिंगळे , चेतन रोकडे , सदाशिव ढाकवळ , निवृत्ती पिंगळे , विनायक ढाकवळ , मोहन राणे , सागर पिंगळे , विशाल वेखंडे , स्वप्निल रेवाळे , स्वप्निल ढाकवळ , अनंता नगरकर , नितीन पिंगळे , नितीन ढाकवळ , अमर रोकडे , रामदास ठाकरे , श्रीपाद राणे , प्रणय पिंगळे , काळुराम गोंधळी , नाना हगवणे, आप्पा नगरकर , गणेश पिंगळे , संजय पिंगळे , संजय चंद्रकांत पवार , सुनील वाघमारे यांच्या सह अनेकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी गावाच्या विकासाबरोबरच शिवसेना पक्षात सर्वांना न्याय व सन्मान दिला जाईल , असे आश्वासन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिले . यावेळी राहुल पिंगळे यांना ” शिवसेना बीड जिल्हा परिषद वार्ड विभाग प्रमुख ” म्हणून पद देण्यात आले.याप्रसंगी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , तालुकाप्रमुख संभाजी जगताप, माजी सभापती मनोहर दादा थोरवे , तालुका संघटक सुनील रसाळ , पराग चव्हाण , सुरेश फराट व अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.