Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे " यांचा मोठ्या मताधिक्याने " विजयी...

” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचा मोठ्या मताधिक्याने ” विजयी ” होणार – कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत – खालापूर मतदार संघ हा आरपीआय ( आठवले ) पक्षाचा बालेकिल्ला आहे . या मतदार संघात आरपीआय ज्या पक्षा सोबत असतो , त्या पक्षाच्या उमेदवाराचा ” विजयी ” हा निश्चित असतो , हा आजपर्यंतचा इतिहास असून होणाऱ्या २० तारखेला मतदान व २३ तारखेच्या मतमोजणीच्या दिवशी आरपीआय पक्षाच्या मिळणाऱ्या भरघोस मतांनी महायुतीचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे हे ” विजयाची वेस ” पार करून त्यांच्याच अंगावर ” गुलाल ” उधळणार व या मतदार संघात पुन्हा एकदा डौलाने विकास कार्याचा ” भगवा ” फडकणार , असे मत आरपीआय ( आठवले ) पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी व्यक्त केले आहे .

कर्जत विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांनी गेल्या अडीच वर्षांत या मतदार संघात २९०० कोटी इतका निधी या मतदार संघात आणून या मतदार संघाचा ” कायापालट ” करून त्यांच्या संकल्पनेतून ” नंदनवन ” केले आहे . आजपर्यंत असा ” दमदार – आमदार ” या मतदार संघात झाला नाही . विकासाला प्राधान्य देवून ” गाव तिथे विकास ” असे सूत्र त्यांनी फक्त अडीच वर्षांत प्रत्येक्षात उतरवून दाखविले . या मतदार संघात बौद्ध समाजाचे अस्मिता असणारे ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ” उभे करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होवून त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले आहे . त्याचप्रमाणे त्यांनी ५२ फुटी श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती , शिवसृष्टी , छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती स्मारक , डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार , भजन भूषण गजानन बुवा पाटील स्मारक , आमराई येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन पुल , प्रशासकीय भवन , कर्जतची नवीन पाणी स्कीम , भिसेगाव गेट ते चार फाटा रस्ता , कर्जत ते चौक रस्ता , भिसेगाव – कर्जत रेल्वे भुयारी मार्गाचे काम देखील सुरू होणार आहे , खालापूर तालुक्यात देखील त्यांनी खूप कामे केली असून असे ” एक ना अनेक ” कामे त्यांनी केल्याने खऱ्या अर्थाने ते ” विकास पुरुष ” संबोधले जात आहेत . तर महा भयंकर ” कोरोना ” काळात देखील येथील जनतेचा जीव वाचविण्यासाठी भरीव कार्य केले आहे .

या मतदार संघातील ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) ” या पक्षाच्या सर्व पदाधिकारी , महिला आघाडी , व कार्यकर्त्यांनी शिवसेना – भाजप – आरपीआय – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ईतर मित्र पक्ष या महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा निवडून द्यायचे असून त्यांच्या प्रचाराची आपल्या भागात ” रणधुमाळी ” उडवून जोमाने काम करा व येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ ला आपल्या बुथवर सर्वांत जास्त मतदान कसे होईल , याची हमी उचलून ” भीमशक्ती व शिवशक्तीचे ” शिवसेनेचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या , असे आवाहन आरपीआय ( आठवले ) गटाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष तथा जेष्ठ नगरसेवक राहुल डाळींबकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व मतदार बंधू – भगिनींना केले आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page