(प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे)
खोपोली समाजाच्या प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी कार्यस्थ फाउंडेशन ही संस्था असून तिच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी युवानेते चंद्रकांत बावदाने यांची नुकतीच निवड झाली.
समाजातील प्रत्येक घटकांवर होणारे अन्याय अत्याचार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत, आरोग्य शिबीर, वक्तृत्व स्पर्धा असा विविध माध्यमातून या संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय उघडे व प्रदेशाध्यक्ष रुपेश कदम यांनी केली आहे.
तर संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी रोहा येथील तरुण तडफदार नेते चंद्रकांत बावदाने यांची नुकतीच निवड करण्यात आली त्यांची निवड होताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर या संस्थेत ज्यां युवकांना काम करायचे असेल संस्थापक विजय उघडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विजय उघडे यांनी केले आहे.