Thursday, November 21, 2024
Homeपुणेलोणावळाकार्ला माळवली इंद्रायणी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीसाठी अंगठे...

कार्ला माळवली इंद्रायणी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीसाठी अंगठे धरो आंदोलन…

कार्ला : कार्ला ते मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा या मागणीसाठी परिसरातील चार युवकांनी आज सोमवारी अंगठे धरो आंदोलन करण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात या पुलाचे रुंदीकरण व नूतनीकरण काम सुरू करण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम व्हावे अशी नागरिकांची मागणी होती मात्र काम मोठे असल्याने ते काम पूर्ण झाले नव्हते. वेळोवेळी याबाबत आंदोलन झाल्यानंतर 28 ऑगस्ट पर्यंत पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार पुलावरून दुचाकी व हलकी वाहने यांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र पुलाचे उर्वरित काम व सुरक्षा भिंतीचे काम व लहान सहान कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील भाऊ हुलावळे, संदीप तिकोने, संदीप गायकवाड व कैलास येवले यांनी अंगठे धरो आंदोलन केले. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेत एक महिन्यात सर्व काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, इथून पुढं कुठल्याही कारणास्तव पुलावरची वाहतूक बंद करू नये, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पत्रे / ब्यारीकेट्स लावावेत, पुलावर लाईटचे पोल लावून रात्री लाईट व्यवस्था करावी, कार्ला गावातील जो आदिवासी वाहून गेला त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, काम पुर्ण झाल्यावर पुलाच्या दोन्ही बाजूचे नदीपात्र स्वच्छ करून द्याव्यात इत्यादी मागण्या यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page