पवनानगर प्रतिनिधी : काले विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक पदी शिवसहकार सेनेचे विलास गंगाराम कालेकर यांची भरघोस मतांनी निवड करण्यात आली.
यामध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पॅनल विरुद्ध श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनल अशी लढत होती. या निवडणुकीत दोन्ही पक्षाचे उमेदवार आमने सामने होते त्यामुळे या निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप आले होते. यात दोन्ही पॅनलचे 6 उमेदवार असे समान उमेदवार निवडून आले आहेत.संपूर्ण मावळाचे या काले विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होता. यामध्ये मतदारांनी मात्र दोन्ही गटांना समसमान कौल दिलेला आहे . एकूणच ही सोसायटी.काले विविध कार्यकारी सोसायटीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
1)विकास प्रल्हाद कालेकर 2)लहू मारुती कालेकर 3)विलास गंगाराम कालेकर 4)अंकुश पांडुरंग शेडगे 5)बाळू धुंदाजी कालेकर 6) दत्तात्रय विठ्ठल कालेकर 7)नंदू किसन कालेकर
8) चिंधू गजानन कालेकर तसेच.
महिला प्रतिनिधी विजयी उमेदवार
1) सुनिता दत्तात्रय कालेकर 2)प्रियंका भाऊ कालेकर
इतर मागास वर्ग विजयी उमेदवार…
ज्ञानेश्वर तुकाराम आढाव
अनुसूचित जाती जमाती राखीव….व बिनविरोध उमेदवार
लक्ष्मण शंकर भालेराव
त्याचबरोबर एकाच पॅनलमधील विजय चंद्रकांत कालेकर व चिंधू गजानन कालेकर या दोन उमेदवारांना समान मते मिळाली होती . यात चिठ्ठी टाकण्यात आली, या चिट्ठी मधून गजानन कालेकर हे विजयी झाले आहेत.