if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
बौद्ध बंधू भगिनींनी दिला ” चलो धम्म की और ” चा नारा…
भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) कर्जत तालुका हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो, याच कर्जत तालुक्यातील चळवळीचे अतिशय महत्वाचे गाव म्हणजे किरवली.
तालुक्यातील चळवळीचे केंद्रबिंदू असणारे किरवली गाव पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे ते म्हणजे येथील धम्म बंधू भगिनी यांनी बांधलेल्या बोधिसत्व बुद्ध विहारामुळे. किरवली येथील धम्म बांधवानी ” येतील त्यांच्या सोबत , न येतील त्यांच्या शिवाय ” निसर्गाच्या सानिध्यात थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने व श्रमदानातून सुंदर असे ” बुद्ध विहार ” बांधले आहे.सदर बुद्ध विहाराचा उदघाट्न समारंभ रविवार दि . १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माजी कोकण प्रदेश नेते , कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती राहुलजी डाळिंबकर , किरवली ग्राम पंचायत सरपंच संतोष सांबरी, माजी उपसरपंच संजय बडेकर, माजी उपसरपंच विनोद बडेकर , सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ बडेकर, आरपीआय चे कर्जत ता. माजी सचिव मनोज गायकवाड, कर्जत शहर माजी सचिव सुनील सोनावणे, कर्जत शहर माजी युवक अध्यक्ष राहुल गायकवाड, गौरकामर्थ वॉर्ड माजी अध्यक्ष संतोष जाधव, RPI चे निष्ठावन्त कार्यकर्ते विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते निळी फित कापून या बुद्धविहाराचे उदघाट्न करण्यात आले तसेच कमिटीच्या बोर्ड चे सुद्धा अनावरण करण्यात आले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे कोकण प्रदेश नेते,पालिकेचे बांधकाम सभापती राहुलजी डाळिंबकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात किरवलीतील धम्मप्रिय बंधू भगिनींचे तोंडभरून कौतुक केले, बुद्ध विहार हे धम्म प्रचार व प्रसारचे केंद्र आहे , त्यामुळे प्रत्येक गावात बुद्ध विहार असलेच पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले, किरवली गावात सध्याचे जे बुद्ध विहार आहे त्यापेक्षा भव्य दिव्य असे बुद्ध विहार उभे करण्यासाठी शासकीय, निमशासकीय व वैयक्तिक स्तरावर जी काही मदत लागेल ती सर्वतोपरी मदत मी व माझा RPI पक्ष करेल , असे आश्वासन त्यांनी उपस्थिताना दिले.
त्याच बरोबर चांगले कार्य करत असताना विरोध हा होणारच पण विरोध करणाऱ्यांकडे लक्ष न देता आपण आपले धम्म कार्य असेच पुढे चालू ठेवावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी उपस्थितना दिला.
किरवली गावात पण्याची समस्या भीषण असून कर्जत-खालापूर चे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या सहकार्याने पाण्याची समस्या देखील लवकरात लवकर सोडवू , असा शब्द त्यांनी दिला.यावेळी बोधिसत्व बुद्ध विहार कमिटी चे अध्यक्ष – प्रकाश खंडू गायकवाड, उपाध्यक्ष – राहुल चंद्रकांत गायकवाड , रंजना गोटीराम गायकवाड, सचिव – विजया दीपक सोनावणे, उपसचिव – अमोल काशिनाथ भालेराव, आदित्य बाळाराम गायकवाड, निशांत नंदकिशोर जाधव, खजिनदार – किरण सुनील गायकवाड, अमिता प्रकाश गायकवाड, कार्याध्यक्ष – गोटीराम गणपत गायकवाड, अस्मिता अरुण कदम, सल्लागार – सागर सुभाष गायकवाड, शारदा जनार्दन गायकवाड, अशोक जनार्दन गायकवाड, नंदकिशोर सखाराम जाधव, कार्यवाहक – शरद रमेश गायकवाड, अक्षय नारायण जाधव, योगेश सुदाम गायकवाड, स्वप्निल सुरेश गायकवाड, रोशन प्रभाकर गायकवाड, सदस्य – अर्जुन पांडू गायकवाड, मनेश सुदाम गायकवाड, सुजाता सिद्धेश गायकवाड, योगिता प्रशांत गायकवाड, सुमिता सुजित गायकवाड, रंजना भगवान गायकवाड, रचना यशवंतत गायकवाड, दिशा मोहन गायकवाड, पुष्पा राजकुमार गायकवाड, रमाबाई काशिनाथ भालेराव, प्रणित प्रकाश सोनावळे, मारुती जनार्दन गायकवाड , सुरेश पांडू गायकवाड, सुमेध दीपक सोनावळे, तसेच कुसुम नारायण जाधव, चंद्रकांत धोंडू गायकवाड, प्रकाश वामन सोनवळे, दीपक काशिनाथ सोनावळे, सुनील रामदास गायकवाड, राजकुमार खंडू गायकवाड, जनार्दन धोंडू गायकवाड, संतोष काशिनाथ भालेराव, मंगेश विठ्ठल गायकवाड, उमेश सुदाम गायकवाड, सिद्धेश सुदाम गायकवाड, कल्पेश सुनील गायकवाड, रत्नदीप गोटीराम गायकवाड, प्रतीक प्रकाश गायकवाड, आदर्श प्रकाश गायकवाड, संकल्प प्रकाश गायकवाड, गौतम सखाराम जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे उल्हास जाधव कोषाणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे कर्यकर्ते गिरीश रतन अभंगे ममदापुर, किरण तुकाराम कनोजे भडवळ, समीर दत्तात्रेय बडेकर, सागर लक्ष्मण बडेकर, अशोकभाऊ खाडे, विजय जाधव, सुमित भालेराव, माधुरी सुमित भालेराव, सुरज पंडित, प्रतीक प्रभाकर गायकवाड, शैलेश नारायण जाधव, राजेश गणपत गायकवाड, समीर गणपत गायकवाड, प्रेम शरद गायकवाड, पंढरीनाथ अर्जुन गायकवाड, नितीन हनुमंत गायकवाड ई. कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.