आरपीआय कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड आक्रमक पावित्र्यात…
भिसेगाव-कर्जत (सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर या बौद्ध वस्तीत व परिसरात विज कंपनीचा सावळागोंधळ चालू आहे , लावलेल्या ट्रान्सफॉर्मरची शक्ती कमी असल्याने विजेचा दाब कमी – जास्त होत असून त्याचा परिणाम घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर होऊन पर्यायाने नागरिकांचे यामुळे नुकसान होत आहे.
याला जबाबदार असणाऱ्या कर्जत वीज कंपनी कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके व कनिष्ठ अभियंता डफळ यांना वारंवार तक्रारी करूनही ट्रान्सफॉर्मर बदली करत नसल्याने नागरिकांत प्रचंड संताप पसरला आहे , नागरिकांच्या रोषाचे ग्रामपंचायत सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्याने आक्रमक पावित्रा घेऊन वीज कंपनी कर्जत कार्यालयात निवेदन देऊन १०० के.व्ही.चा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची क्रोध मागणी आरपीआय ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी केली असून अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा ईशारा त्यांनी दिला आहे.
किरवली ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांची वस्ती झपाट्याने वाढत असून नवनवीन घरे , इमारती होत असताना पूर्वीचा वीज कंपनीने लावलेला ट्रान्सफॉर्मर फक्त २५ के.व्ही. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने त्यावर जादा भार पडून वीज समतोल न रहाता अनेकवेळा परिसरात एक फेज जाणे , वीज जाणे , असे प्रकार सतत होत आहेत . याबाबतीत अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करूनही वीज कंपनीचे अभियंता हे लक्ष देत नव्हते .याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे .
यामुळे नागरिक वीज कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.याबाबतीत आरपीआय कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड रहात असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून कर्जत वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांची भेट घेऊन निवेदन दिले असून , लवकरात लवकर १०० के.व्ही.क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास आपल्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करू , असा क्रोध ईशारा अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी वीज कंपनीस दिला आहे.