if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सरशी झाली असून खांडस ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीमध्ये शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाचे किशोर पोसाटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे पोसाटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेल्या खांडस गावापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व आहे , हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे . मागच्या वर्षी या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. तर नुकतेच या ग्रामपंचायतीचे उपसरपंच लहू काशिनाथ ऐनकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज दिनांक १० जुलै रोजी सरपंच ताई पादीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर विहित वेळेत शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाचे किशोर पोसाटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला , त्यामुळे थेट सरपंच ताई कचरू पादीर यांनी किशोर पोसाटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते , तर ग्रामसेवक बाळकृष्ण मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी काम पाहिले.
किशोर पोसाटे यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम दादा कोळंबे , संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, बाजीराव दळवी , निलेश थोरवे , लक्ष्मण पोसाटे , असीम बूबेरे , रवींद्र ऐनकर , संतोष पाटील , माजी सरपंच मंगल ऐनकर , गोपीनाथ भोईर , विलास माळी , बाळू ऐनकर , दाजी ऐनकर , सीताराम बांगरे , दीपक ऐनकर , भरत ऐनकर, शिवाजी ऐनकर, सुरेश ऐनकर , बंदू पोसाटे , दुंदा पोसाटे , महादेव ऐनकर आदी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या .