Friday, October 18, 2024
Homeपुणेमावळकुंड मळा येथे पाण्यात वाहून गेलेल्या ओमकार चा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू पथकाला...

कुंड मळा येथे पाण्यात वाहून गेलेल्या ओमकार चा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू पथकाला यश…

मावळ (प्रतिनिधी): कुंड मळा येथे शुक्रवारी मित्रांसोबत फिरायला आलेला ओमकार बाळासाहेब गायकवाड हा तरुण पाण्यामध्ये खेळत असताना प्रवाहासोबत वाहून गेला. दोन दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर आज त्याचा मृतदेह मिळून आला आहे.
तसेच त्याच दिवशी ओमकार चा मित्र आदित्य गायकवाड याने देखील ओमकार बुडाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक ठाकरांच्या प्रसंगावधानाने तो बचावला.
ओमकार बाळसाहेब गायकवाड (वय 24, रा. मूळ नगर जिल्हा) असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. वर्षा विहाराचा आनंद घेण्याकरिता ओमकार हा मित्रांच्या सोबत तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे आला होता. सध्या मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर असल्याने कुंडमळा येथील वाहणाऱ्या या प्रवाहामध्ये ओमकार उतरला असता तो वाहून गेला. ओमकार वाहून गेल्याची माहिती तळेगाव पोलीस व मावळ तालुका वन्यजीव रक्षक संघटना यांना समजल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळाची व परिसराची पाहणी करण्यात आली. शनिवारी सकाळपासून कुंडमळा येथे ज्या ठिकाणाहून ओमकार वाहून गेला तिथून पुढील काही भागांमध्ये त्याचा शोध घेतला जात होता.मात्र शनिवारी उशिरापर्यंत त्याचा शोध न लागल्याने आज रविवारी पुन्हा शोध मोहिम राबवत त्याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.
खरंतर कुंडमाळा येथील प्रवाहामध्ये पर्यटकांनी उतरू नये, वाहत्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये असे सूचना फलक तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मागील आठवड्यातच कुंडमळा या ठिकाणी लावले होते. तरी देखील पर्यटक प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत अती उत्साहाच्या भरात पाण्यामध्ये जात असल्याचे समोर येत आहे.
यावेळी शिवदुर्ग रेस्कू पथक, वन्यजीवरक्षक मावळ व आपदा मित्र या संघटनांचे सुनील गायकवाड, शुभम काकडे, सुरज शिंदे, निलेश गराडे, महेश मसने, राजेन्द्र कडू, जिगर सोळंकी, अनिल आंद्रे, यश बच्चे, विनय सावंत, प्रथमेश सुपेकर, विश्वनाथ जावळकर, कमळ परदेशी, तुषार सातकर, गणेश मोरे, गणेश निसाळ, सचिन गायकवाड, गणेश ढोरे, गणेश गायकवाड, प्रशांत शेडे यांच्या पथकाकाला दोन दिवस शोध मोहीम राबवत आज अखेर ओमकारचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page