Thursday, July 17, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे आमची हक्काने मागणी "

” कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे आमची हक्काने मागणी “

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचे पालकमंत्री पदावरून महत्त्वपूर्ण वक्तव्य !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्याचे आदरणीय ” मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ” आणि ” उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ” हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आम्ही सर्व मंत्री व आमदार एका कुटूंबातील सदस्य आहोत. झालेला ” आनंद ” किंवा मनातील ” सल ” अशा सगळ्याच बाबी आपण कुटुंब प्रमुखांकडे व्यक्त करतो, तशी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची भावना मी कुटुंब प्रमुखांकडे व्यक्त केली. यावरून कर्जत मधील भारतीय जनता पक्षाच्या काही ” विघ्न संतोषी ” कार्यकर्ते विनाकारण रण पेटवत आहेत , त्यांनी ते बंद करावे , असे महत्त्वपूर्ण मत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले आहे.


तत्कालीन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन २०२२ मध्ये आम्ही ” हिंदूत्वासाठी ” उठाव केला. त्यानंतर शिवसेना-भाजपा युतीचे सरकार राज्यात आले. यामध्ये आमचे नेते शिंदे साहेब व आमची महत्वाची भूमिका होती. त्या नंतरच्या काळात मंत्री ” उदयजी सामंत ” यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार आहेत , त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे ही आमच्या शिवसैनिकांची पूर्वीपासूनची रास्त भावना आहे , अश्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला.


रायगडात विकासासाठी दिला जाणारा निधी तटकरे यांच्याकडून दुसरीकडे वळविला जात आहे. शिवसेना आमदारांना ते दुय्यम वागणूक देत आहेत. त्यामुळे महायुतीत कायमच ” मिठाचा खडा ” टाकणाऱ्या तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद न देता मंत्री भरतशेठ गोगावले यांना ते द्यावे , ही आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही हक्काने आमच्या कुटुंब प्रमुख म्हणजे फडणवीस साहेब व शिंदे साहेब यांच्याकडे ही मागणी केली आहे. आमच्या कुटुंब प्रमुखांनी आम्हाला न्याय द्यावा , असे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मत व्यक्त केले.


यावरून कर्जत मधील भारतीय जनता पक्षाचे काही विघ्न संतोषी कार्यकर्ते विनाकारण रण पेटवत आहेत. मी केलेल्या नाराजीवर त्यांना कसला ” पोटशूळ ” उठला आहे , हे कळायला मार्ग नाही , पण त्यांना माझे सांगणे आहे की, विनाकारण या वक्तव्याला वेगळं राजकीय वळण देऊ नये , असे महत्त्वपूर्ण विधान कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page