Saturday, June 21, 2025
Homeपुणेलोणावळाकैवल्यधाममध्ये ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

कैवल्यधाममध्ये ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

‘योग संगम’ उपक्रमांतर्गत विविध संस्थांमध्ये योगाभ्यास; IG सुनिल फुलारी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन..

कार्यक्रमानंतर श्री. सुबोध तिवारी यांनी IG सुनिल फुलारी यांचा शाल व ‘कॉफी टेबल बुक’ देऊन सन्मान केला. राष्ट्रीय सुर्यदत्त ‘सुर्यभूषण पुरस्कार २०२५’ प्राप्त फुलारी यांचे कायद्याच्या अंमलबजावणीतील योगदान अधोरेखित करण्यात आले.

यावेळी कैवल्यधाम योग महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शरद भालेकर लिखित ‘योगमय पोलीस’ तसेच डॉ. स्टुअर्ट रोज आणि स्वामी महेशानंद लिखित ‘Philosophy of Yoga’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री. फुलारी यांच्या हस्ते झाले. ‘योगमय पोलीस’ हे पोलीस दलासाठी उपयुक्त ठरणारे आरोग्यवर्धक मार्गदर्शनपर पुस्तक आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कैवल्यधाम संस्थेने खालील १० ठिकाणी तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्रांचे आयोजन केले :

  1. ऑर्डनन्स फॅक्टरी, देहूरोड
  2. द ग्रेट ईस्टर्न अकॅडमी (नेव्हल कॅडेट्स), लोणावळा
  3. L&T ट्रेनिंग सेंटर, लोणावळा
  4. पोलीस ट्रेनिंग स्कूल, खंडाळा
  5. INS शिवाजी नेव्हल बेस, लोणावळा
  6. कैवल्य विद्या निकेतन स्कूल, लोणावळा
  7. टाटा पॉवर, वलवण
  8. खोपोली पॉवर हाऊस
  9. भिरा पॉवर हाऊस
  10. फरियाज रिसॉर्ट, लोणावळा

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सिंगला यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. सुबोध तिवारी यांनी केले. सांगता ‘ॐ पूर्णमदः’ पाठाने करण्यात आली.
कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसाठी अल्पोहार आयोजित करण्यात आला.

कैवल्यधाम संस्थेने ‘योगः एक पृथ्वी, एक आरोग्य’ या प्रेरणादायी थीमनुसार शरीर, मन आणि पर्यावरणाच्या आरोग्याचा समतोल साधण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला.

- Advertisment -

You cannot copy content of this page