वाकसई ( प्रतिनिधी ) : वाकसई ग्रुप ग्रामपंचायत मधील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी विशाल सुरेश केदारी यांचे नुकतेच अल्पशः आजाराने वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले . मनमिळाऊ स्वभावाचा विशाल यांचे गावातील प्रत्येकाशी स्नेहाचे नाते होते.
व्यक्ती कोणीही असो भाऊ,दादा,ताई,वहिनी म्हणत सर्वांना आपलेसे वाटणारे तसेच पाणीपुरवठा करण्याच्या निमित्ताने वाकसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घराघरात पोहचलेल्या कै .विशाल यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात याकरिता त्यांचे मोठे बंधू, जगदगुरू संत तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल केदारी आणि ग्रामदैवत वनोबा महाराज तरूण मंडळ यांच्यावतीने वाकसई गावात जेवण बनविण्यासाठी सभागृह बांधण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या स्मरणार्थ धार्मिक स्थळाना देणगी देऊन वाकसई चाळ येथील आदिवासी कुटूंबांना अन्न धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल केदारी , शाम विकारी , किरण येवले , सागर गुगले , अनिल बुद्रुक , संतोष येवले , रोशन केदारी , संतोष ढाकोळ , उमेश येवले , अकाश येवले , स्वप्निल केदारी , संदिप कारके , आदेश केदारी , सौरभ विकारी , संकेत केदारी आदी जन उपस्थित होते.