Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकोकणचे भाग्य विधाते " खासदार सुनीलजी तटकरे " यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये पाक...

कोकणचे भाग्य विधाते ” खासदार सुनीलजी तटकरे ” यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये पाक कला स्पर्धेचे आयोजन !

पाक कला स्पर्धेत अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी , १८५ महिलांचा सहभाग ,लोकनेते ” सुधाकर भाऊ घारे ” यांचा स्तुत्य उपक्रम..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महिला म्हटल्या की , खाद्य पदार्थ आलेच . आपले सुप्त गुण , आपली आवड , त्यात थोडंसं प्रेम , व ” माहेरवाशीण तर सासरच ” नाव उंचावणारी गृहिणी , अशी ओळख सांगणारी आपली भगिनी कधीच कुठे मागे न हटणारी असल्याने या भगिनिंचे रुप व त्यांची कला सर्वांसमोर येण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकनेते , कार्यसम्राट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तारणहार सुधाकर भाऊ घारे नेहमीच प्रयत्न करताना दिसत असतात . महिला भगिनींसाठी दरवर्षी त्यांना प्रोत्साहन देणारे स्तुत्य उपक्रम राबवून सन्मानित करत असतात . ” कोकणचे भाग्य विधाते ” खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून , महिला व बाल कल्याण मंत्री मा. आदिती ताई तटकरे यांच्या संकल्पनेतून कर्जत खालापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका महिला अध्यक्षा ऍड. रंजना धुळे यांच्या देखरेखीखाली ” पाक कला स्पर्धेचे ” आयोजन कर्जतमध्ये बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी रॉयल गार्डनच्या भव्य सभागृहात साकारण्यात आले होते . यांत तालुक्यातील विविध भागातील १८५ महिला भगिनींनी मोठ्या उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता.

कोकणच्या संस्कृतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं भोजन , स्वादिष्ट , पौष्टिक आणि मन तृप्त करणारे तसेच अस्सल कोकणी चव आणि संस्कृतीतील असंख्य प्रकारच्या खाद्यपदार्थांनी कर्जतकरांना या कार्यक्रमाने भूरळ घातली . ” शोध सुगरणीचा, कोकणातील खाद्य संस्कृतीचा ” या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे याच्या माध्यमातून ” रायगडचे भीष्माचार्य , धुरंधर नेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब ” यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुकास्तरीय पाक कला स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोकणी संस्कृतीतील आणि कोकणात पिकणाऱ्या धाण्यापासून महिलांनी असंख्य प्रकारचे खाद्यपदार्थ स्पर्धेत बनविले होते. शाकाहारी, मांसाहारी, रानभाज्या अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल या स्पर्धेनिमित्त कर्जतकरांना पहायला मिळाली.

अलिकडच्या काळात फास्टफुड , जंक फुडमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार जे धान्य पिकते, किंवा जे खाद्य पदार्थ उपलब्ध होतात , त्यानुसार खांद्यसंस्कृती देखील बहरत असते. कोकणची खाद्यसंस्कृती ही वैशिष्टपूर्ण संस्कृती आहे. कोकणच्या खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि ती टिकवून ठेवणाऱ्या महिलांच्या हातातील कला गुणांना वाव मिळावा , या उद्दात हेतूने येथील ” कुशल नेतृत्व सुधाकर भाऊ घारे ” यांच्या माध्यमातून ” पाक कला स्पर्धेचे ” आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधाकर भाऊ घारे यांनी या स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धक महिलां भगिनिंशी संवाद साधला. खाद्यपदार्थांची माहिती घेतली. महिलांच्या कलागुणांचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन दिले.

या स्पर्धेसाठी प्रसिद्ध शेफ राजीव कुमार आणि संजय डाफडे हे परिक्षक म्हणून लाभले. त्यांनी या स्पर्धेची तोंड भरुन स्तुती केली. तसेच कोकणी खाद्य पदार्थांची अशी भव्य स्पर्धा भरविल्याबद्दल सुधाकर भाऊ घारे यांचे देखील कौतुक केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत महिला अध्यक्षा ऍड. रंजना धुळे , बंधू देशमुख , राम कोळंबे , विनय वेखंडे , कर्जत ता. युवा अध्यक्ष स्वप्नील पालकर , संतोष थोरवे , राजन क्षीरसागर , प्रवीण देशमुख , भगवान पाटील , प्रमोद खडे , महिला जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पूजा सुर्वे , कर्जत शहराध्यक्षा तथा मा. नगरसेविका मधुरा चंदन पाटील , नेरळ शहराध्यक्षा राजश्री कोकाटे , माथेरान शहराध्यक्षा स्वाती कुमार , मा. नगरसेविका भारती पालकर , वंदना थोरवे , छाया वेखंडे , विमल देशमुख , मनीषा ठोंबरे , मनीषा देशमुख , मनीषा पाटील , प्रभावती लोभी , निराताई विचारे , वृषाली क्षीरसागर , दीपाली पिंगळे , स्मिता घुडे , प्रतिभा लोहकरे , वंदना शिंदे , मीनाक्षी शेमटे , कर्जत शहर युवती अध्यक्षा युक्ता भोपतराव , अंकिता मोरे , प्राची तवले , आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

कोकणचे भाग्य विधाते खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ” पाक कला स्पर्धेचे ” आयोजन केले होते. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला , असंख्य प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी महिलांनी बनविले होते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन व वाव मिळावे , कोकणची खाद्यसंस्कृतीचा वारसा संवर्धित व्हावा हा हेतू त्यामागे होता , असे मत याप्रसंगी सुधाकर भाऊ घारे – मा. उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद यांनी व्यक्त केले . तर पावसाळ्याचे दिवस असतानाही ” पाक कला स्पर्धेसाठी ” तालुक्यातील जवळजवळ १८५ महिलांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला. कोकणच्या खाद्य संस्कृतीचा खऱ्या अर्थाने शोध घेणे आणि त्यातूनच उत्तम ” सुगरणींचा ” शोध लावणे , या उद्देशाने पाक कला स्पर्धा आयोजित केली होती , असे मत ऍड.रंजना धुळे , अध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस, कर्जत तालुका यांनी व्यक्त केले.

यावेळी या पाक कला स्पर्धेत प्रथम क्रमांक वदप येथील उर्मिला विचारे यांनी पटकावला. त्यांना रेफ्रिजरेटर बक्षीस मिळाले , द्वितीय क्रमांकाच्या मानकरी अर्चना अंमराळे या ठरल्या , त्यांना मायक्रोवेव्ह ओव्हन बक्षिस मिळाले , तर तृतीय क्रमांक रुपाली पालकर तसेच कीर्ती देशमुख यांना विभागून देण्यात आले , त्यांना मिक्सर बक्षीस मिळाले . प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस वैशाली आंबोळे यांना तर द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस आरुषी चारी यांना देण्यात आले . त्यांना प्रत्येकी डिनर सेट बक्षिस देण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page