Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कोण अंगावर आले , तर शिंगावर घ्या " पण येथील गद्दारांना...

” कोण अंगावर आले , तर शिंगावर घ्या ” पण येथील गद्दारांना या निवडणुकीत हाकलून द्या – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे..

” पुढील आमदार शिवसेनेचाच होईल ” – उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) लोकसभा निवडणुकीत मी दिलेला शब्द तुम्ही पाळला व या मतदार संघात १८ हजारांची आघाडी घेतली , हा पहिला टप्पा आपण जिंकलो , आत्ता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून यायचं आहे , असा उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांना आदेश देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित तमाम शिवसैनिकांना भावनिक साद घातली , यावेळी घोषणांची आतिषबाजी करत उपस्थित शिवसैनिकांनी त्यांना दुजोरा दिला . ” शिवसंपर्क अभियान ” अंतर्गत कर्जत खालापूर विधानसभा संवाद दौऱ्या निमित्त आज मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक ३ वाजता श्री साईकृपा शेळके मंगल कार्यालय , किरवली – कर्जत येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर सचिन अहिर – शिवसेना उपनेते तथा विधानपरिषद आमदार , सौ. किशोरी ताई पेडणेकर – महिला संपर्क प्रमुख रायगड , तथा मा. महापौर मुंबई , रायगड संपर्क प्रमुख बबन दादा पाटील , उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , कर्जत ता. प्रमुख उत्तम दादा कोळंबे , खालापूर ता. प्रमुख एकनाथ पिंगळे , महिला जिल्हा संघटिका – मा. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , विधानसभा संघटिका कल्पना पाटील , जेष्ठ नेते भाई शिंदे , सुनील पाटील , संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर , संघटक बाबू घारे , युवा सेना विधानसभा अधिकारी ऍड. संपद हाडप ,राजाराम शेळके , कर्जत ता. अधिकारी प्रथमेश मोरे , माथेरान मा. नगराध्यक्ष सावंत , कर्जत शहर प्रमुख निलेश घरत , बाजीराव दळवी , त्याचप्रमाने मतदार संघातील उप तालुका प्रमुख , विभाग प्रमुख , संघटक , शिवसेना – युवा सेना – महिला आघाडीच्या पदाधिकारी व तमाम शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते.

यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ” पन्नास खोके , एकदम ओके ” याची आठवण काढत , येथील आमदारांवर जहरी टिका करत , ४० आमदारांनी केलेली गद्दारी महाराष्ट्रात सर्वाँना समजावून सांगण्यासाठी पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले की सर्वांनी दौरे घेवून यांची गद्दारी सांगा . जे गद्दार असतात ते हिंदू नसतात , असा आरोप देखील त्यांनी केला . लोकसभेत यांना धडा शिकवला , आता या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून हाकलून द्या , असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.ज्या भाजपाला या देशात हुकूमशाही आणायची होती , संविधान बदलायच होत , म्हणूनच ते ४०० पार म्हणत होते , पण आपण सर्वांनी त्यांना रोखले , म्हणूनच त्यांचा आवाज दबला गेला , आपण त्यांना रोखल आहे.
संविधानात नसताना देखील ४० आमदार फुटून घटनाबाह्य मुख्यमंत्री घडतो , म्हणजे संविधान विरोधी काम भाजपा ने केले आहे . असा घणाघात करत ४० आमदार , १२ खासदार , अनेक नगरसेवक पळवून देखील महाराष्ट्रात आपण तुमच्या जोरावर ” नंबर १ ” आहोत , अशी शाबासकीची थाप त्यांनी शिवसैनिकांना दिली . सर्वांनी उध्दव साहेबांना डोळ्यासमोर ठेवून मतदान केले आहे , म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बदल घडवायचा आहे , ” गद्दारांची कीड ” आपल्याला घालवायची आहे , नितीन आता आपल्याला ५० हजारांच्या लीड ने जिंकायच आहे , असा आदेश त्यांनी उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांना देत शिवसैनिकांकडून आश्वासन घेतले.

पुढील निवडणुकीत तुम्हाला फोडायचा , तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील , केसेस करू पहातिल , पण येथील शिवसैनिक घाबरणारा नाही , जर कोण अंगावर आले , तर त्यांना शिंगावर घ्या , असा आदेश त्यांनी शिव सैनिकांना दिला . विकास कामांच्या निधीतून हे ह्यांचे व ठेकेदाराची हित बघत आहेत , जनतेचे नाही , यांचे पैसे खाण्याचे काम महाराष्ट्र लुटण्याचा काम सुरू आहे , यावर त्यांनी प्रकाश टाकला . येथील सर्व प्रोजेक्ट गुजरातला पाठवायचे , दुसऱ्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रात उद्योग आणला का ? तर नाही , घटना बाह्य मुख्यमंत्री इतर काहीतरी खटपट करून पैसा कमावित आहेत , हे लुटमार करणारे सरकार आपण दूर करायचे आहे , असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
जाती जातीत वाद घालण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे , मात्र महाराष्ट्रातील जनतेचा उध्दव साहेबांवर विश्वास आहे , हि व्यक्ती आपल्याला फसवणार नाही , असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले . आपली चूल पेटण बंद होईल , म्हणून प्रत्येक दिवस प्रचाराचा आहे , आपली निशाणी ” मशाल ” प्रत्येक घरात पेटलीच पाहिजे , येथे पुन्हा ” भगवा फडकवा ” असा आत्मविश्वास त्यांनी उपस्थित शिव सैनिकांत जागवला . यावेळी अनेकांचा पक्ष प्रवेश मान्यवरांच्या उपस्थितीत झाला .यावेळी सभागृह खचाखच भरला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत आमदार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच होईल , असे चित्र एकंदरीत वातावरणाने दिसून येत होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page