![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
८ पैकी ७ सामने ” जिंकत ” अव्वल कामगिरी , कर्जतची ” वंशिका संजय मोहिते ” हिचा चमकदार खेळ….
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या ” HK बाउन्स क्रिकेट अकॅडमी “, पुणेच्या अंडर-17 चमूने श्रीलंकेत भरवलेल्या ” इंडो-लंका क्रिकेट टूर्नामेंट ” मध्ये आपली चमकदार कामगिरी सिध्द केली. एकूण ८ सामन्यांमध्ये विक्रमी ६ विजयी कामगिरी करत , १ सामना बरोबरीत , आणि केवळ १ पराभव – अशी धुंवाधार खेळी करून अव्वल ठरले आहेत.
ही स्पर्धा कोलंबो, खाटूनायके आणि नुराइलिया या विविध श्रीलंकन शहरांमध्ये पार पडली. बेसिलिका क्रिकेट क्लब , गोल्डन क्रिकेट अकॅडमी , आणि आय पी एन क्रिकेट अकॅडमी या संघा सोबत हे सामने खेळवण्यात आले. विशेष म्हणजे, नुराइलिया शहरात तब्बल ” १२ अंश सेल्सिअस ” तापमानात म्हणजेच कडक थंडीतही ” HK बाउन्स ” च्या खेळाडूंनी जिद्दीने सामना खेळत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
” HK बाउन्स ” अकॅडमीचे प्रशिक्षक हेमंत किणीकर , अमोल माने , आणि रोहिणी तबीब यांचे विजयाच्या उंबरठ्यावर नेणारे व निर्णायक ठरणारे ” मार्गदर्शन ” या यशामागचे खरे ” शिल्पकार ” ठरले. तर श्रीलंकेतील बेसिलिका क्रिकेट अकॅडमीचे कोच रोशन सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंशी सामना देत, भारतीय खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध केली.
या क्रिकेट खेळाडूंमध्ये आर्या मोने, ध्रुव कोंढरे, मयूर सासवडे, हर्षवर्धन जगताप, अजिंक्य पुजारी, आदर्श चव्हाण, अरिहंत उदावंत, वंशिका मोहिते, स्वरा तबीब, ऋषभ वाधवानी, शार्दूल गराडे, अवनीश गौणकर, श्रीराज घोरपडे यांचा समावेश असून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या क्रिकेट कौशल्याने मने जिंकली आहेत. सर्वोत्तम फलंदाज आर्या मोने , सर्वोत्तम गोलंदाज अजिंक्य पुजारी , मॅन ऑफ द टूर्नामेंट मयूर सासवडे , हर्षवर्धन जगताप , उभरते खेळाडू वंशिका संजय मोहिते, अरिहंत उदावंत यांनी चमकदार कामगिरी केली.
” वंशिका संजय मोहिते ” ही कर्जतची कन्या असून तिचे वडील पत्रकार संजय मोहिते हे क्रिकेट खेळत अष्टपैलू खेळाडू म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. सिझन क्रिकेट यामध्ये ते अव्वल आहेत , त्यामुळे वंशिका ने क्रिकेटचे धडे आपल्या घरातूनच घेतले आहेत . कर्जत च्या ” के ई एस इंग्लिश मेडीयम स्कूल ” ची ती विध्यार्थीनी असून तिने आपले क्रिकेटचे प्राथमिक प्रशिक्षण कोच राजेंद्र कोंडाळकर यांच्याकडे घेतले , पुढे आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अधिक प्रगती साधण्यासाठी ती सध्या पुणे येथे कोच शुभेंद्रू भांडारकर, हेमंत किणीकर, अमोल माने, आणि सुदेश लाटे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. वंशिकाच्या या क्रिकेट विश्वातील प्रवासात ” के इ एस इंग्लिश मेडीयम स्कूल ” चे कमिटी मेंबर, प्रिंसिपल, आणि शिक्षकवर्ग यांच्या प्रोत्साहनामुळे ” उभरता खेळाडू ” म्हणून तिची निवड ही कर्जतकरांसाठी ” अभिमानाची व गौरवास्पद ” बाब ठरली आहे . वंशिकाच्या यशस्वी कामगिरीबद्दल तिच्यावर क्रिकेट विश्वातील व क्रिडा क्षेत्रातील अनेक चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या यशस्वी प्रवासात अद्विता पुजारी, सुजाता गौणकर , शीतल कोंढरे तसेच संजय मोहिते या माता-पित्यांनी आपल्या मुलांना दिलेली साथ ” प्रेरणादायी ” ठरली. दरम्यान ” HK बाउन्स क्रिकेट अकॅडमीचा ” हा ” विजय ” केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरता मर्यादित नसून तर हा उद्याच्या भारताच्या क्रिकेट विश्वातील भविष्याचा आत्मविश्वासदायक ” बाऊन्स ” म्हणायला हरकत नाही .