लोणावळा : खंडाळा बोर घाटात कि.मी.40 वर सहा वाहनांचा भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जन जखमी झाले आहेत.
महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. यामध्ये कंटेनर,2 ट्रक, 2कार, टेम्पो अशा 6 वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन कार ट्रकच्या मध्ये चेंगरल्याने यामधील गौरव खरात ( वय 36), सौरभ तुळसे ( वय 32), सिद्धार्थ राजगुरू ( वय 31), एकाचे नाव समजले नाही हे सर्व राहणार सोलापूर या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जन किरकोळ जखमी व चार जन गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना MGM हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल करून किरकोळ जखमींवर रुग्ण वाहिकेमध्येच प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघात स्थळी खोपोली पोलीस हजर असल्यामुळे 4 मयतांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात पुढील कारवाई साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई दिशेने लेनवर किमी 39.000 येथे ट्रकचा टायर फुटला,हा ट्रक मुंबईच्या पहिल्या लेनवर बंद पडल्याने कि मि.40.000 पर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहतूक संथ गतीने सुरु होती. त्यावेळी अपघातातील ट्रक नं. MH 46 AR 3877 यावरील चालकाचे नियंत्रण सुटून त्याने समोरील स्विफ्ट कार नं. MH 13 BN 7122 व टेम्पो नं. MH 10 AW 7611 ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सदर वाहने त्यापुढील कार नं. MH 21 BQ 5281 वर आदळून हा भीषण अपघात झाला आहे. यातील दोन्ही कार ट्रकच्या मध्ये चेंगरल्यामुळे स्विफ्ट मधील चौघाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर दुसऱ्या कार मधील 3 प्रवासी यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णावाहिकेमधेच प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच टेम्पो मधील 4 प्रवासी यांना गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारा करीता MGM हॉस्पिटल कामोठे येथे पाठवीण्यात आले आहे.
तसेच मृत्युंजय टिम मधील गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले सह त्यांचे सदस्य आणि देवदूत पथक, IRB यंत्रणांनी अपघातग्रसतांना बाहेर काढून अपघातातील सर्व वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.