लोणावळा : राजमाची व्हिएयु पॉईंट , खंडाळा येथे नव्याने उभारण्यात आलेले दोन सेल्फी बोर्ड हे पर्यटकाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत .
रोटेरिअन नितीन कल्याण यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे हे सेल्फी बोर्ड उभारण्यात आले असून याठिकाणी पर्यटकांची सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
लवकरच बोर्डाच्या आजू बाजूचा परिसर हा सुशोभीत व स्वच्छ करण्यात येणार आहे. लोणावळायात सुद्धा अश्या प्रकारचे सेल्फी बोर्ड लावण्याचा रोटरी क्लबचा विचार आहे.