if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी) :लोणावळा शहर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी.खडकी , पुणे येथे घरफोडी करून दागिने आणि चारचाकी वाहन घेऊन फरार झालेल्या अट्टल दरोडेखोराला स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोणावळ्यातून जेरबंद करण्यात लोणावळा पोलिसांना यश आले आहे .
रामजीतसिंग रणजितसिंग टाक ( वय 19 , रा . गाडीतळ , हडपसर , पुणे) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यात तब्बल 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 7.30 वाजता लोणावळा पोलिसांना खबर मिळाली की , खडकी येथे एका घरात घरफोडी रामजीतसिंग रणजितसिंग टाक ( वय 19 , रा . गाडीतळ , हडपसर , पुणे करून काही दरोडेखोर तेथील अॅस्टोर ( MH 12 UD 8001 ) ही चार चाकी वाहन घेऊन लोणावळ्याच्या दिशेने फरार झाले असून गाडीचे जीपीएस लोकेशन लोणावळा असे दाखवत आहे . या माहितीच्या आधारे सदर गाडी ही नांगरगाव औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीपुढे उभी असल्याचे पोलिसांनी शोधले .
लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर अबनावे , शकील शेख , जयराज पाटणकर , पोलीस नाईक नितीन सूर्यवंशी , सुधीर डुंबरे , पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वायदंडे व स्वप्नील पाटील यांनी तेथील कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि काही स्थानिक नागरिकांना मदतीला घेत गाडीच्या आजूबाजूला सापळा रचला . त्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेला आरोपी रामजीतसिंग टाक याला चोरीच्या गाडीसह मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले . मात्र दरम्यान त्याच्या सोबत असलेले इतर आरोपी निहालसिंग टाक , लकीसिंग टाक आणि राहुलसिंग भुंड ( सर्व रा . गाडीतळ , हडपसर , पुणे ) हे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले . लोणावळा पोलिसांनी सदर आरोपी आणि चोरीमधील गाडी खडकी पोलिसांच्या ताब्यात दिली असून पुढील तपास खडकी पोलीस करत आहे.