Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखांडस गावातील शिंदे गटाचे खांडस विभागप्रमुख रवी ऐनकर यांची शिवसेनेत पुन्हा घरवापसी...

खांडस गावातील शिंदे गटाचे खांडस विभागप्रमुख रवी ऐनकर यांची शिवसेनेत पुन्हा घरवापसी !

उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचा करिश्मा..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचा करिश्मा सध्या कर्जत – खालापूर मतदार संघात जोरात सुरू असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष सोडून गेलेले अनेक शिवसैनिक स्वगृही परतत आहेत . कर्जत तालुक्यातील खांडस विभागातील शिंदे गटाचे खांडस विभागप्रमुख रवी ऐनकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश नुकताच ” शिवालय ” येथे झाला असून यानिमित्ताने शिंदे गटाला खिंडार पडून हादरा बसला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिंदे गटाचे खांडस विभागप्रमुख रवी ऐनकर व खांडस गावातील तरुण स्वगृही परतले असून उपजिल्हाप्रमुख नितीन दादा नंदकुमार सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत रवी ऐनकर यांनी शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला तर गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ग्रुप ग्रामपंचायत खांडस मधील मौजे खांडस गावातील शिंदे गटाचे खांडस विभागप्रमुख रवी ऐनकर यांची शिवसेनेत पुन्हा घरवापसी झाल्याने विभागात शिवसेना वाढीसाठी अधिक बळकटी येणार असून उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांनी शिवसेनेकडून खांडस विभागासाठी लागेल ती मदत आपल्या सर्वांना केली जाईल , असे आश्वासन याप्रसंगी दिले. खांडस विभागातील या सर्व युवकांचा प्रवेश ग्रामपंचायत खांडस ला नवसंजीवनी देणारे ठरणार असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यास मदत करणारे आहे , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खांडस विभागप्रमुख रवी ऐनकर, खांडस गटप्रमुख अनंता ऐनकर, खांडस शाखाप्रमुख विठ्ठल ऐनकर, ज्येष्ठ शिवसैनिक नारायण ऐनकर, तुकाराम पादिर, शिवसैनिक जगन्नाथ ऐनकर,नरेश ऐनकर, नागेश ऐनकर, ज्ञानेश्वर ऐनकर, गणेश ऐनकर, पुंडलिक माळी, मंगल जैतु ऐनकर, प्रकाश भगत, काशिनाथ भगत यांनी प्रवेश केला असून कर्जत तालुकातील अनेक गावातील तरुणांचा वाढता ओघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे दिसून येत आहे. नितीनदादा नंदकुमार सावंत यांनी उपजिल्हाप्रमुख पदाची सूत्र हाती घेतल्यापासून पक्ष वाढीसाठी जातीने लक्ष घातले आहे.
या पक्ष प्रवेशाला उपजिल्हाप्रमुख नितीन दादा नंदकुमार सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, संघटक बाबू घारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निखिल पाटील, युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, सहसंपर्कप्रमुख अविनाश भासे, उपतालुका प्रमुख प्रमोद सुर्वे, माजी सभापती पंढरीनाथ राऊत, जिल्हापरिषद विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, जिल्हापरिषद संघटक बाजीराव दळवी, शहर प्रमुख निलेश घरत, पंचायत समिती विभाग प्रमुख दिनेश भासे, नरेश शेळके, गणेश मोडक, माजी विभागप्रमुख संतोष ऐनकर, माजी शहरप्रमुख संतोष पाटील, माजी नगरसेवक कृष्णा घाडगे, जेष्ठ शिवसैनिक दिलीप बडेकर, ज्ञानेश्वर भालिवडे, युवासेना उपतालुका अधिकारी ऋषकेश सोनावळे, जिल्हापरिषद संघटक किशोर पोसाटे, माजी पंचायत समिती विभाग प्रमुख विनायक चोखट , मोठ्या प्रमाणात युवा सैनिक आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page