if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कर्जतमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील घटना..
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) लाचलुचपत प्रतिबंधक खाते हे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करत असतात , मात्र पहिल्यांदाच कर्जतमध्ये सरकारी कार्यालयात खाजगी व्यक्तीवर लाचलुचपत खात्याकडून १ लाख रुपये घेताना कारवाई करण्यात आली आहे , ही कारवाई संशयास्पद वाटत असून कुण्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम तर या एलसीबी च्या अधिकारी वर्गाने केली तर नाही न , अशी चर्चा सध्या कर्जत तालुक्यात होत आहे.कर्जत तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालय हे लाच घेण्यात अव्वल नंबर वर आहे. मागील काही महिन्यांत या कार्यालयातून अनेक जणांनी लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस येऊन त्यांच्यावर लाचलुचपत खात्याने कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खाते एखादया सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी वर्गाने लाच मागितली असेल तरच त्याची खात्री करूनच धाड टाकतात , मात्र यावेळी कर्जत भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी इसम असलेल्या विजय रामू ठाकरे यांच्यावर सापळा रचण्यात आला . मात्र शंका अशी येऊ लागली की , त्याने मागितलेली १ लाख रुपयांची रक्कम ज्यांची जागा मोजायची होती त्यांनी ती रक्कम मागणारा व्यक्ती सरकारी आहे की , खाजगी याची कुठलीही खातरजमा न करता कशी दिली , खाजगी व्यक्ती कुणाच्या आशीर्वादाने तिथे काम करतो , ती रक्कम देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी वर्गास तक्रार दिल्या नंतर त्या अधिकारी वर्गाने कुठली क्लिप ऐकल्यावर व ती व्यक्ती नक्की सरकारी लोकसेवक आहे की , खाजगी व्यक्ती आहे , मग ती खाजगी व्यक्ती तिथे कुणाच्या अधिकार क्षेत्रात काम करते , याची खात्री का केली नाही , अशी तक्रार आल्यावर एखादा खाजगी व्यक्ती लाच मागत असेल तर ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अंतर्गत कारवाई होण्यास तक्रार होते का , याची खातरजमा करणे गरजेचे होते.
अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यात मोडते का ? की कुठल्या अधिकारी वर्गाला पाठीशी घालण्याचे काम हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी वर्गाने केली आहे , अशी चर्चा आता कर्जत तालुक्यात होत असून झालेली कारवाई संशयास्पद वाटत आहे.तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना कर्जत भूमी अभिलेख येथील खाजगी भूमापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेला विजय रामु ठाकरे या व्यक्तीवर ही कारवाई करण्यात आली आहे . धोत्रे येथील जमीन मोजमाप करण्यासाठी ठाकरे यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती , दरम्यान पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेण्याचा ठरला असता अखेर एक लाख रुपये स्वीकारताना विजय रामू ठाकरे हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला असून कर्जत तालुक्यातील धोत्रे गावातील जमीन सर्वे नंबर ८३ / १ / १०० ही २७००० स्क्वेअर मीटर एन ए जागा वेगिन्थ ग्लोबल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सन २०२१ मध्ये खरेदी केली असून सदर जागेची मोजमाप करायची असल्याने तक्रारदार यांनी कर्जत भूमी अभिलेख कार्यालयास भेट दिली.
दरम्यान विजय रामू ठाकरे यांनी आपण भूमापक अधिकारी असल्याचं तक्रारदार यांना भासवून त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती . अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केल्याने विभागीय अधिकारी सुनील लोखंडे तर अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखालील लाचलुचपत विभागातील अधिकारी वर्गाने सापळा रचला होता , अखेर आरोपी विजय रामू ठाकरे हे जमीन मोजमाप प्रकरणातील पहिल्या हप्त्यातील रक्कम घेत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे .मात्र झालेली कारवाई हि संशयास्पद वाटत असून , खाजगी व्यक्तीवर कारवाई करून शासकीय लोकसेवक याला तर पाठीशी घातला नाही न ? अशी चर्चा आता कर्जत तालुक्यात रंगतदार होत आहे .