Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात गणपतीच्या मुकुटावर विराजमान चक्क अजगर....

खालापुरात गणपतीच्या मुकुटावर विराजमान चक्क अजगर….

(खालापूर प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे )
खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध अश्या ऍड लॅब इमॅजिका जवळील गणपती मूर्तींकार सतीश लखीमले यांच्या कारखान्यात आज गणपती बप्पा च्या मुकुटावर चक्क अजगर जातीचा साप वेटोळे घालून बसल्याची आश्चर्यजनक घटना घडली.यांबाबतची माहिती कारखाना मालक लखीमले यांनी सर्पमित्र चेतन चौधरी व संदेश चौधरी यांना दिल्याने त्यांनी त्या अजगराला श्री गणेशाच्या मूर्तीवरून सावधानतेने बाजूला करून ताब्यात घेतले.

व वनविभागाच्या नियमानुसार सापाची संपूर्ण माहिती घेतली असता तो साधारण ४ फूट लांबीचा असल्याचे आढळून आले.नंतर सर्पमित्र चेतनने अजगराला सुरक्षित वनक्षेत्रात सोडून दिले. या घटनेतील आगळेपण लक्षांत घेता वाऱ्याच्या वेगाने हि बातमी सर्वत्र पसरली आणि सोशियल मीडियावर फोटो व्हायरल होऊ लागले.

श्री गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तांमध्ये या अजगराची भर पडली आहे अशी चर्चा सुरु असताना तो गणेशच्या मुकुटाला वेटोळे घालून बसल्याचे सगळ्यांना औत्सुक्य होते. हि घटना दुर्मिळ स्वरूपाची असल्याने श्रद्धेच्या भावनेतून याकडे बघितले जात आहे. त्या अजगराने खरोखरच त्या मूर्तीच्या सौदर्यात भर घातली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page