Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात धनगर समाजाचे ढोल बजावो आंदोलन ढोल बाजवून केला सरकारचा केला निषेध..

खालापुरात धनगर समाजाचे ढोल बजावो आंदोलन ढोल बाजवून केला सरकारचा केला निषेध..


खालापूर-दत्तात्रय शेडगे
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी सकल खालापूर तालुका धनगर समाजाच्या वतीने ढोल बजावो, सरकार जगावो, आंदोलन आज करण्यात आले हे आंदोलन आज शिंग्रोबा मंदिरात ढोल वाजवून सरकारचा निषेध करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आंदोलन करीत असून अजूनही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही त्यामुळे आज पुन्हा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भर ढोल बजावो ,सरकार जगावो आंदोलन करून सरकारला पुन्हा आठवण करून देण्यासाठी आज आंदोलन केले आहे यात महाराष्ट्र सरकार धनगर समाजला आरक्षण देण्यासाठी गंभीर नाही, त्यामुळे आज झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या सरकार ला जागे करण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गाचा दाखला दयावा, धनगर समाजाची न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला सरकारच्या वतीने चांगल्या वकिलाची नेमणूक करावी, याचिका कोर्टात जलद गतीने चालवावी, सरकारने आदिवासीना ते धनगर समाजाला या तत्वावर दिलेले 1000 कोटी पॅकेज त्वरित ध्यावे, या मागण्यासाठी आज शिंग्रोबा मंदिर बोरघाट येथे ढोल वाजवून सरकारचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.

यावेळी धनगर समाजाचे नेते तथा शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे, आतकरगाव ग्रामपंचायतचे सदस्य दत्तात्रय शेडगे, जेष्ठ नेते रामभाऊ आखाडे, दीपक आखाडे, दशरथ देवकाते, काशिंलिंग यमगर,नारायण हिरवे, बापू बावदाने,किशोर झोरे, गणेश गोरे, सोमनाथ तुपे, संतोष घाटे, एकनाथ घाटे, अरविंद गोरे, सतिश गोरे पांडुरंग जानकर, विवेक योगे,दत्ता हिरवे, मंगेश घाटे, नरेश आखाडे,अंनता मरंगले, आदी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page