if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली- दत्तात्रय शेडगे
राज्यात सद्य अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे सगळी कडे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने खालापूरात एक दिवसीय धरणे आंदोलन करून खालापूरचे नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट आले असून सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई खात्यात जमा करावी या मागणी साठी राष्ट्रीय समाज पक्षाने आज खालापूर तहसील येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करून खालापूरचे नायब तहसीलदार कल्याणी कदम यांना निवेदन दिले.
यावेळीं राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे , खालापूर तालुका युवक अध्यक्ष रितेश शेलार, खालापूर तालुका अध्यक्ष हरेश ढेबे, युवक अध्यक्ष उमेश पाटील, प्रज्वल गायकवाड आदींसह अनेक रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते.