खालापूर(दत्तात्रय शेडगे)देशात कोरोना आजाराने सगळीकडे थैमान घातले असून यामुळे गोर गरीब जनतेला आपला जीव गमवावा लागत आहे मात्र आता खालापूर पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील माडप, नारंगी, भिलवले, शिरवलीवाडी आणि केलवली ही पाच गावे दत्तक घेऊन आज त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले तर आजपासून या गावात वेगवेगले उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये गावातील सर्व नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असून त्यांची ऑक्सिजन व थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्याचे सुरू आहे.
गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क करून आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्याचे उपाय योजना राबविण्यात येणार आहेत.
स्थानिक प्रशासनाचे मदतीने १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तसेच कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधीने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी उपचार सुविधा राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.निराधार महिला, एकाकी राहणारे ज्येष्ठनागरिक, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
गावातील भाजीपाला विक्री व किराणा दुकानाचे ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर या नियमाचे पालन करून अत्यावश्यक वस्तू वितरण याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे.तर गावपातळीवर बिट अंमलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आशावर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस पाटील, यांच्यासह ग्रामकृती दलाची स्थापना करून कोरोना आजारांला आला घालण्यासाठी या सगळ्याचा मदतीने विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले.
यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, सहायक पोलिस निरीक्षक, संजय बांगर, महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई, पोलीस नाईक नितीन शेडगे, अमित सावंत, विठ्ठल घावस, खालापूर पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील तुषार आठरे आदी उपस्थित होते.