![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) प्रशासकीय भवनात एकाच ठिकाणी सर्व कार्यालये असल्यास नागरिकांना कामे करणे सोपे होईल , हा उद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते ” खालापूर प्रशासकीय भवनाचे ” सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रशासकीय मान्यता रक्कम रु. १० कोटी ३१ लक्ष रू. खर्च करून हे भव्य असे प्रशासकीय भवन उभे रहाणार असून या भवनमुळे नागरिकांना शासकीय कामे करण्यास सहज सोपे होणार आहे.
यावेळी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी , खालापूर नगरपंचायतीचे प्रथम नागरिक – नगराध्यक्षा रोशनी मोडवे, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड , खालापूर मुख्याधिकारी रश्मी चव्हाण , उपअभियंता राखाडे , बीडिओ राजपूत , संतोष जंगम , उपतालुकाप्रमुख नाना देशमुख , जेष्ठ पत्रकार बाबू पोटे , उत्तम परबलकर, तालुका प्रमुख संदेश पाटील, युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे, खालापूरचे सर्व नगरसेवक शिवसेना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.