प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापुरात शेकापच्य प्राचराचा नारळ फुटला.खालापुर नगरपंचायत वर शेकापचा लाल बावटा फडकविण्यासाठी शेकाप सज्ज खालापुर नगरपचांयतीच्या निवडणुक प्रचाराचा शुभारभं महड येथील वरदविनायकाचा आशिर्वाद घेऊन शेकापचा आणि शिवसेना चा प्रचाराचा नारळ फुटला.खालापुर नगरपचांयत मधील सत्तेचा दावेदार म्हणुन शेकाप कडे पाहीले जाते.
सपंलेल्या नगरपचांयत मध्ये शेकापने १७ पैकी १० जागा निवडुन आणुन राष्ट्रवादीच्या दोन जागा सोबत घेऊन सत्ता राबवली होती. मात्र आता राष्ट्रवादीची आघाडी सेनेसोबत असल्याने शेकापने १६ जागांवर उमेदवार उभे करुन विरोधकांना पुन्हा तगडे आवाहन दिले आहे.यातच माजी नगराध्यक्ष शिवानी जगंम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सघ़टनात्मक पातळीवर सर्वांना निवडुन आणण्याची जबाबदारी खाद्यांवर घेतली आहे. शेकापच्या या रणनितीमुळे विरोधक धस्तावले आहेत. आणि खाताशिप्र मडंळाचे अध्यक्ष संतोष जगंम हे नामाप्र मधुन उमेदवार असुन या जागेची निवडणुक स्थगित आहे.
म्हणुन जगंम पती पत्नी हे स्वता सर्व सदस्यांना निवडुन आणण्याचे पुर्ण ताकदीने प्रयत्न करणार ही शेकापच्या जमेची बाजु आहे.काल दि. १४ डिसेबंर शेकापच्या सर्व उमेदवारांसह शिवानी जगंम यांनी वरदविनायकाचा आशिर्वाद घेऊन प्रचाराच्या नारळ फोडला.यावेळी शेकाप नेत्या माजी नगराध्यक्ष शिवानी जगंम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ‘वरद विनायकाचे आम्हाला कौल दिलेला आहे मला खात्री आहे की गेल्या वेळेस आम्ही 10 जगावर निवडून आलो होतो यावेळी 16 च्या 16 जागांवर नक्की विजयी होऊ.उमेदवार कोण हे असण्यापेक्षा आपल्याला खालापुर चा विकास करायचा आहे.
खालापुरच नाव कान्या कोपऱ्यात पोहचल पाहिजे हे ध्येय डोक्यात आहे त्यामुळे या उमेदवार म्हणून कोणीही असल तरी काम करणारे संतोष जंगम आणि शिवानी जंगम हे कायम आहे, राहणार आहे जी काम अर्धवट राहिलेली आहेत ती काम आम्हाला पूर्ण करायची आहेत. त्याचा उत्साह आमच्यामद्ये पाहायला मिळत आहे.खालापुर नगरपचांयत ने हाती घेतलेली 95 टक्के काम पूर्ण झाली आहेत.
35 कोटींची पाण्याची योजना कशी 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी करता येईल हा प्रयत्न करणार आहोत. खालापुरकराना एवढंच सांगेल 2016 च्या निवडणुकिती आम्हाला भरघोस यश दिले आहे. यावेळी सुद्धा आम्हाला संधी द्या जी विकास कामे प्रलंबित आहेत विकास कामे आहेत, मैदान, हॉस्पिटल ही पूर्ण करण्याची गरज आहे म्हणुनच पुन्हा एकदा आम्हाला संधी द्या. असे यावेळी शिवानी जगंम यांवी जनतेला भावनिक आवाहन केले.