Sunday, December 22, 2024
Homeपुणेखोपोलित बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकाची फसवणूक प्रकरणी अखेर बिल्डर ला अटक..

खोपोलित बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकाची फसवणूक प्रकरणी अखेर बिल्डर ला अटक..

खोपोली दि.13: (प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे ) :खोपोली येथील बांधकाम व्यवसायिक राठोड यांनी माजी सैनिक भरत काकडे यांच्याकडून प्रोजेक्ट मध्ये एक गाळा देण्यासाठी 15 लाख रुपये बुकिंग रक्कम म्हणून घेतले होते.सदरचा प्रोजेक्ट सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे प्रोजेक्ट तयार होण्यास विलंब होत असल्याने बांधकाम व्यवसायिक हसमुख राठोड यांनी माजी सैनिक भरत काकडे यांना प्रोजेक्ट ला उशीर होत असल्यामुळे आपली फसवणूक केली जात असल्याचा दावा केला.

या बाबत चर्चा केल्यानंतर ही एकमत न झाल्याने बिल्डर हसमुख राठोड यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर राठोड यांनी तात्पुरती बेल घेतली होती. मात्र ही बेल निष्फल ठरल्याने अखेर राठोड यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

याबाबत या घटनाक्रमाचा खुलासा करताना काकडे यांच्या कडून गाळ्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून 15 लाख चेक स्वरूपात घेतले होते त्याचा ताबा 2021 मध्ये द्यावयाचे ठरले होते मात्र या बांधकामास अनेक अडचणी आल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नसल्याने त्याची माहिती बांधकाम व्यवसायिक हसमुख राठोड यांनी ग्राहक भरत काकडे यांना दिली.

मात्र मागील तीन वर्षांपासून बांधकाम सुरू असताना प्रकल्प का पूर्ण होऊ शकत नाही असा सवाल केल्याने याबाबत आपण दुसऱ्या प्रकल्पातील तयार असणारा गाला देत आहे मात्र तो प्रस्ताव मान्य नसल्याने काकडे यांनी दिलेले पैसे मी परत देतो आणि बँक व्याजदर नुसार तुम्हाला व्याजासह
देतो असे सांगितल्यावर दोघांमध्ये एक मत झाले नाही त्यामुळे बिल्डर हसमुख राठोड यांच्यावर 3 डिसेंबर रोजी खोपोली पोलीस ठाण्यात सैनिक भरत काकडे यांनी 420 चा गुन्हा दाखल केला होता.

- Advertisment -

You cannot copy content of this page