if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
खोपोली पळसधरी कर्जत रस्त्यावर केलवली गावाजवळ रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका तेलाच्या टँकर ला भीषण आग लागली,या आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
कर्जत हुन खोपोली कडे खोबरे तेल घेऊन टँकर जात असताना तो केलवली गावाजवळ आला असता त्याला अचानक आग लागली या आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून सुदैवाने चालक बचावला आहे.
या घटनेची तात्काळ माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दल आणि अपघातात ग्रस्त सामाजिक संस्थेचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत ही आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न केले.