प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
खोपोली पाली रोडवरील ब्राईड ईर्व्हरमेन्ट सोल्यशन कपंनीला भीषण आग, मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही.उबंरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेटं सोल्युशन कपंनीला लागलेल्या आगीमध्ये गोडाऊन पुर्णपणे जळुन खाक तर प्लाटंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान. सदर कपंनीच्या आवारातच कामगार राहत असल्याने आगीचे प्रमाण पाहता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणे गरजेचे होते.
खोपोली फायर ब्रिगेड टिम, प्रसोल केमिकल फायर ब्रिगेड टिम, गोदरेज कपंनीची फायर फायटिगं टिम ने पाच तासाच्या अथक प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळविले असले तरी गोडाऊन ला लागलेली आग मात्र धुमसत आहे. प्लास्टीकवर प्रक्रीया उद्योग असल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली.
कपंनीच्या जवळुन गेल ईडिंयाची पाईप लाईन जात असल्याने गेल ईडिंयाची फायर फायटिगं टिम सह खालापुर पोलीसही घटनास्थळी होते उपस्थीत.अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सस्थेंच्या टिम चे सदस्य असलेल्या केमीकल एक्सपर्ट धनजंय गीध सह गुरूनाथ साठीलकर, विजय भोसले, अमित गुजरे, अंकित साखरे, शैलेश आबंवणे, यतिन दळवी व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाची मदत केली.