खोपोली (दत्तात्रय शेडगे)शहरातून कर्जत वरून मुंबई कडे जाणारा रेल्वे मार्ग असून या खोपोली रेल्वे स्थानकाच्या बाजूला खोपोली शहराचा भाग येत असल्याने लोकवस्ती आहे.
शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान खोपोली स्थानकातून सुटलेले रेल्वे खाली येथील एका रिक्षा चालक युवकाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.खोपोली शहरातील साईबाबा नगर येथील रिक्षा चालक जफर फारूक शेख वय 26 रा मुकुंद नगर या युवकाने सायंकाळी खोपोली रेल्वे स्थानकातून कर्जत कडे जाण्यासाठी 4: 20 ला सुटलेल्या रेल्वे रुळावर खोपोली हद्दीत झोपून आपली जीवनयात्रा संपविली.
या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसासह खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून सदरचा मृतदेह कर्जत कडे नेण्यात आला.