एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी..
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खोपोली पुण्याहून मुबंई कडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने शिलाफाट्यावर समोरील उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात ट्रक मधील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.पुण्या हुन मुबंई कडे जुन्या महामार्गाने ट्रक जात असताना तो खोपोली शिलफाट्या जवळ आला असता चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील उभ्या असलेल्या टेम्पो आणि टपरी ला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला, यात ट्रकच्या केबिनचा चक्कचुर झाला असून चालक केबिन खाली अडकले होते.
या अपघाताची तात्काळ माहिती खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीम च्या सदस्यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक खाली अडकलेल्याना बाहेर काढण्यात मदत केली, मात्र यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.