![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
प्रतिनिधी: श्रावणी कामत.
लोणावळा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील खराब रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी मनसे लोणावळा अध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
प्रभाग क्र. १ तसेच न्यू तुंगार्ली, इंदिरानगर, अंबरवाडी रोड, गोल्ड व्हॅली परिसर, प्रिचली हिल या भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, या रस्त्यांवरून गणेशोत्सव मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे नगरपरिषदेनं तातडीने या रस्त्यांची डागडुजी करून खड्डे बुजवावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी प्रवक्ते अमित भोसले, सुनिल साळवे, संघटक अभिजित फासगे, सुनील सोनावणे, निलेश लांडगे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, आकाश सावंत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.