if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कार्ला : (प्रतिनिधी) सदगुरु ईश्वरदास अमृतवाणी सत्संग ट्रस्ट भांगरवाडी लोणावळा यांच्यातर्फे दरवर्षी अकराव्या दिवशी होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीत अन्नदान केले जाते. याही वर्षी ट्रस्ट तर्फे गुरुजी विजेंद्र यांच्या शुभहस्ते ८००० गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
लोणावळा शहरात दरवर्षी अकराव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक हजारो गणेश भक्तांचे उपस्थितीत संपन्न होते. या काळात लोणावळा शहरातील हॉटेल्स बंद असतात. रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढली जाते. गणेश भक्तांना दरवर्षी ट्रस्ट तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते. प्रत्येक गणपतीपुळे ढोल ताशा पथक वाद्यवृंद या सर्वांना महाप्रसादाचे वाटप केले गेले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गणेश भक्तांचे स्वागत बापूसाहेब पाटील यांनी केले. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावळे ,उपाध्यक्ष मारुती देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रमेश व्यास, लोणावळा नगरपरिषद माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अरुण लाड, माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड, राजू बच्चे, लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेवक विशाल पाडाळे, माजी नगरसेवक देविदास कडू, पत्रकार विशाल विकारी, बंडू येवले , भाऊ म्हाळसकर ,मनसे अध्यक्ष भारत चिकने,अमित भोसले या मान्यवराने उपक्रमाचे कौतुक केले.
मुंबई येथून मोठ्या प्रमाणात अनुयायी कार्यक्रमात सहभागी झाले होते विजय चौधरी, रेणू चौधरी, किरीट भट, ईश्वरलाल बिरीवाल, सुरेंद्र जालन, साक्षी जलान ,जयप्रकाश पुरोहित, रमेश मिस्तरी, सुरेश गुप्ता, मीना गुप्ता, महेंद्र झुनझुनवाला,जोना पुरोहित,मुकेश पुरोहित, शत्रुघ्न सिग, लोणावळा येथील प्रमोद बन्सल, सरोज बन्सल, अनीता पाटील, सत्यनारायण अग्रवाल, लक्ष्मी अग्रवाल,पांडुरंग बोराडे, शांता बोराडे ,भगवती प्रसाद अग्रवाल यांनी महाप्रसाद वाटपासाठी मदत केली. लोणावळा नगरपरिषद कर्मचारी लोणावळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.