Sunday, June 22, 2025
Homeपुणेलोणावळागवळीवाडा शाळा क्र.6 मधील चिमुकल्या वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न..

गवळीवाडा शाळा क्र.6 मधील चिमुकल्या वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न..

लोणावला (प्रतिनिधी): गवळीवाडा येथील शाळा क्रमांक 6 मध्ये विध्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उपक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला.
या दिंडी सोहळ्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषा मध्ये सहभागी झाले होते.सदर पालखीची सुरुवात शाळेच्या आवारातून ते श्री राम मंदिर गवळीवाडा येथे विठ्ठलाच्या गजरात नेण्यात आली.श्रीराम मंदिराच्या समोर छोट्या वारकऱ्यांनी अतिशय सुंदर असे रिंगण घातले त्याचबरोबर फुगड्या खेळल्या गेल्या. आपल्या महाराष्ट्र राज्याची भूमि ही अनेक संतांची आहे ही परंपरा कशी जपली जाते याचे महत्त्व अमोल साबळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच या पालखी सोहळ्यामध्ये शाळेतील प्रभाकर पवार, मनीषा सरोदे तसेच शीतल येणारे,अमोल साबळे, मुख्याध्यापिका नंदा तांदळे आदीसह सर्वजण विद्यार्थ्यांच्या बरोबर या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.
विशेषतः या छोट्या वारकऱ्यांना दीपक शिर्के व परिवार यांनी अल्पोहार दिला. त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व शिर्के परिवाराचे खूप खूप आभार मानन्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page