पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याला कोथरूड पोलिसांनी तडीपार केले आहे . घातक व जिवघेण्या हत्यारासह खून , खूनाचा प्रयत्न , गंभीर दुखापत , खंडणी , जीवे मारण्याची धमकी देणे , दहशत निर्माण करणे या स्वरूपाचे गंभीर गुन्हे मोहोळ याने आपल्या साथीदारांसह केलेले आहेत. पुणे शहर , पुणे ग्रामीण , पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . गुंड शरद मोहोळ याला न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे . या शिक्षेविरूध्द आरोपीने न्यायालयात आपील केल्यानंतर त्याला जामीन मंजुर करण्यात आला होता . मात्र मुक्तता झाल्यावर लगेचच त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाणे व हिंजवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले.
शरद मोहोळ याची समाजातील भिती व हिंसा कमी करून त्याच्या या बेकायदेशीर कारवायांना पायबंद घालणे गरजेचे आहे तसेच आगामी निवडणुकीच्या कालावधीत त्याच्याकडून एखादा गंभीर गुन्हा घडू नये . किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या गुंडाला तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते .या आदेशानुसार पुणे शहर , पुणे ग्रामीण , पिंपरी चिंचवड , पुणे जिल्हयातून 6 महिन्यासाठी या गुंडाला तडीपार करण्यात आले आहे.