प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे
पुणे- जिल्ह्यातील पानशेत धरणाचे परिसरातील वेल्हा तालुका अजूनही विकासापासून वंचित आहे, येथे आरोग्य सुविधा ,,दळणवळण सुविधा, उद्योग धंदे ही नाही,तर मोबाईल ला नेटवर्क नाही, या मध्ये काही ठिकाणी रस्ता नाही, त्या ठिकाणी पायी चालत त्या ठिकाणी जाऊन तेथील आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या वेल्ह्यातील 12 धनगर वाड्यांवर शैक्षणिक साहित्य गोर गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
असा तीन दिवस हा उपक्रम धनगर वाडे येथे केला या सर्व मिळून २८२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली व २१ गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्यांना कोणी ही नाही अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे.ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी -कोरोना च्या महामारी संकटामुळे डोंगर दऱ्या खोर्यातील व जंगलात राहणार्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा उपक्रम अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट च्या वतीने व आॅल इडिंया धनगर महासंघाचे वतीने नुकताच पार पडला.
आतापर्यंत पहिल्या टप्प्यात १०३२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली दुसऱ्या टप्प्यात ३४४ विद्यार्थ्यांना मदत केली होती. दुसऱ्या टप्प्यात वेल्ह्यातील 282विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अशा या वेल्ह्यातील अतिदुर्गम ठिकाणी तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी, प्रवीण काकडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आॅल इडिंया धनगर महासंघ, तुकाराम कोकरे संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र आॅल इडिंया धनगर महासंघ, नथुराम डोईफोडे, वेल्हा तालुका अध्यक्ष, संजय हिरवे, वेल्हा तालुका युवक आघाडी अध्यक्ष, शिवाजी मरगळे, संघटक वेल्हा तालुका, सौ देविका ढेबे, संरपंच, महिला आघाडी अध्यक्ष संतोष कोकरे, संरपच,, सौ चंदा ढेबे, तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी, अक्षय डोईफोडे, विद्यार्थी आघाडी प्रकाश हिरवे, सोशल मीडिया प्रमुख पांडुरंग कचरे, धाकु कचरे, गणेश ढेबे, कार्यधयक्ष दीप मरगळे, संतोष ढेबे, सुरेश ढेबे अध्यक्ष विद्यार्थी आघाड़ी,विठ्ठल डोईफोडे व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थत होते.