फिनो हमेशा …..आपके साथ !
भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-
कर्जत सारख्या व्यापारी भाग व नागरी वस्ती असलेल्या मुंबई – पुणे महानगरीचा अविभाज्य शहर बनत असलेल्या कर्जत तालुक्यात ईतर बँकेच्या शाखा किंवा एटीएम सेंटर्स तुरळक प्रमाणात आहेत .गर्दीच्या व कामाच्या वेळी बऱ्याचदा येथे मोठ्या रांगा असतात. तर काही वेळा हमखास शनिवार – रविवार सुट्टीच्या दिवशी एटीएम मध्ये पैसेच नसतात , त्यामुळे पैशाअभावी नागरिकांचा हिरमोड होऊन मोठया प्रमाणात गैरसोय होते.
म्हणूनच अशा ग्राहकांची गरज ओळखून फिनो पेमेंट्स बँकेने ” फिनो हमशा ” आपके साथ , या अभियाना अंतर्गत बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देत आहे . आज या फिनो पेमेंट्स बँकेचे अनावरण कर्जतमध्ये धापया मंदिरासमोर जैतु बडेकर इमारतीत करण्यात आले.या शाखेचे अनावरण कर्जतचे व्यापारी लालचंद पेराजमल ओसवाल यांच्या शुभहस्ते फितची गाठ उघडून करण्यात आले.
यावेळी विक्रम परमार,दिनेश परमार ,कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक जितूशेठ ओसवाल , घेवरचंद बाबूलाल ओसवाल , रणजितशेठ प्रेमचंद ओसवाल , तनुजा परमार , राखी परमार , तसेच फिनो पेमेंट्स बँकेचे झोनल प्रमुख उमेश कदम , बँकेच्या पी.आर .उर्मिला देठे , आदी मान्यवर उपस्थित होते . तर अनेक कर्जतकर या अनावरण कार्यक्रमास उपस्थित होतेे.
यावेळी या बँकेच्या सोई सवलती बाबत माहिती देताना झोनल प्रमुख उमेश कदम म्हणाले कि , कुठल्याही बँक खात्यात रोख रक्कम जमा करणे ,रक्कम काढणे , हस्तांतरण करणे , यासारख्या मूलभूत बँकिंग सेवा या शाखेतून दिल्या जाणार आहेत.तसेच बँकेचे व्यवहार मायक्रो एटीएम उपकरणाद्वारे सुलभ होणार आहेत . नवीन खाते उघडण्याची , बिले भरण्याची , दु चाकी व आरोग्य विमा खरेदी करण्याची सेवा येथे उपलब्ध आहेे.
मोबाईल बिल , वीज आणि गॅस बिल भरणे , या सुविधेसाठी आत्ता कुठल्याही बँक शाखेत जाण्याची गरज नसून कर्जत शहरातून आपल्या घराशेजारीच सर्व सेवा असणार आहेत . रायगड जिल्ह्यात सुमारे बाराशे छोटे बँकिंग पॉईंट्सचे जाळे पसरलेले आहेत , तर कर्जतमध्ये सुमारे ८० बँकिंग पॉईंट आहेत.
किराणा दुकान , मोबाईल रिपेअरिंग दुकान , भारत पेट्रोलियम आणि पंप , यासारखे बँकेचे पॉईंट्स आहेत.कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीत न जाता “फिनो हमेशा , आपके साथ असून राज्यात ३ लाख शाखा आहेत , तर ५० ते ६० कंपनी बँकेस फायनान्स करत आहेत.
म्हणूनच अधिकृत भाग धारक व्हा . फिनो पेमेंट्स बँक आय आर डी ए च्या नियमानुसार काम करत आहे.तर पार्टनर बँकेबरोबर उघडलेल्या स्वीप खात्यातील शिल्लक रक्कमेवर आकर्षक वार्षिक व्याज लागू असणार आहे.ही सेवा २४ तास व सुट्टीच्या दिवशीही मिळणार असून ग्राहक सेवा क्रमांक 02268681414 असा असल्याचे झोनल प्रमुख उमेश कदम यांनी सांगितले.